आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी बचतीबाबत खुद्द महापालिकेचीच अनास्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सन 2011-12 या वर्षात महापालिकेची 4600 दशलक्ष लिटर पाण्याची जलसंपदा विभागाकडे आरक्षित होती. त्यापैकी महापालिका शहराला 3680 दशलक्ष लिटर पाणी पुरविते, यात 1100 दशलक्ष लिटर पाणी मोफत दिले जाते. 20 टक्के गळतीचा आधार घेतला तर 920 दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. म्हणजेच 4600 दशलक्ष लिटरमध्ये 2020 दशलक्ष लिटरची इतकी मोठी गळती अक्षम्य आहे. ज्याची किंमत 12 कोटींच्या जवळपास असून, महापालिकेने याबाबत उत्तर न दिल्याने नेमकी गळती कुठे आणि त्यावर काय उपाययोजना करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मान्सूनला अद्याप अपेक्षित सुरुवात झाली नसल्याने थेंब अन् थेंब पाणी बचतीची जबाबदारी वाढली आहे. मात्र, सिडकोतील इंद्रनगरी, श्रीरामनगर, सावतानगर, रायगड चौक परिसरात पाण्याचा प्रचंड अपव्यय होत असून, महापालिकेनेच कठोर पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी 23 नोव्हेंबर 2012 रोजी पालिका आयुक्तांना पाणी बचतीबाबत माहिती विचारली होती. मात्र, त्यावर अद्याप स्पष्टीकरण दिले गेलेले नाही. यामुळे खुद्द प्रशासनाकडे संशयाची सुई फिरते आहे. जनतेला पाणी बचतीचा संदेश देणा-यामहापालिकेकडूनच होणा-यापाण्याच्या अपव्ययाचे काय, असा गंभीर प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो.