आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मनपाचे दहा वर्षांचे ऑडीटच नाही’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - माहितीच्या आधिकारात मागितलेल्या माहितीनुसार नाशिक महापालिकेचे गेल्या दहा वर्षापासून लेखा परीक्षण झाले नसून, या कालावधीत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रामसिंग बावरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमान 1949 नुसार नाशिक मनपाचे 2001 ते 2010 या कालावधीत लेखापरीक्षण झालेले नाही. त्यामुळे जनतेच्या हक्काच्या करोडो रुपयांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. तसेच अनेक घोटाळे बाहेर काढणार्‍या कॅग संस्थेनेही 2006 च्या पहिल्या लेखापरीक्षण अहवालाबाबत शंका उपस्थित केली आहे.
2007 , 2008, आणि 2010 या तिन्ही वर्षाचे प्रसिध्द झालेल्या अहवालात महापालिकेच्या प्रलंबित लेखापरीक्षणासंदर्भात राज्य शासनाला निर्देश देण्यात आले. तरीही त्यावर कुठलीही दखल महापालिकेने घेतली नसल्याचे बावरी यांचे म्हणणे आहे. या कालावधीतील आयुक्त, महापौर , स्थायी समितीचे सभापती लेखापरीक्षण विभाग, यांच्यावर आरोप करत, गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.