आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्षनेतेपदासाठी भांडणार राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेनेच्या हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसेच्या महाआघाडीमुळे शिवसेनेचे महापौरपदाचे स्वप्न भंगल्यानंतर महापालिकेतील महत्त्वाचे विरोधी पक्षनेतेपदही जाण्याची वेळ आली आहे. हे पद राष्ट्रवादीला देण्याच्या हालचाली सुरू असल्या तरी, आता त्यांना शह देण्यासाठी शिवसेनाही आक्रमक होणार आहे.
राज्यात महायुतीचे वारे वाहत असल्यामुळे शिवसेना, भाजप नेत्यांची उमेद वाढली आहे. विधानसभेच्या तोंडावर मनसेला काँग्रेस आघाडी मदत करणार नाही वाढत्या संख्याबळाचा आधार घेऊन महापौरपद मिळवता येईल म्हणून शिवसेना-भाजपने सलगी केली. तसे झाले नसते मनसेबरोबर राहिले असते तर भाजपला सत्तेचा भागीदार उपमहापौरपद सहज कायम ठेवता आले असते. मात्र, मनसेला शह देण्याची संधी शिवसेने बरोबर युती करून पोषक वातावरण करण्याची खेळी खेळली गेली. त्यामुळे खवळून उठलेल्या मनसेने महाआघाडीला सोबत घेत भाजपला झटका दिला. यात भाजपचे उपमहापौरपद तर गेलेच, मात्र शिवसेनेकडील विरोधी पक्षनेतेपद जाण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीने विरोधी बाकावर बसण्याची तयारी दाखवल्यामुळे आता हे पद त्यांना दिले जाईल असे दिसते. शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्यामुळे या पदावर त्यांच्याकडून दावा होईल. पण, सत्ताधारी मनसे सहजासहजी राजी होणार नसल्यामुळे पुढे न्यायालयीन प्रक्रियेच्या मार्गानेच जावे लागेल त्यात वेळ जाईल हेही सांगण्याची गरज नाही.

सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे तीन महिने तरी, विरोधी पक्षनेतेपदाबाबत कोणताही निर्णय होणार नाही. विरोधी पक्षनेत्याची निवड सत्ताधाऱ्यांकडून केली जाते महापौर त्याची घोषणा महासभेत करतात. निवडणूक आचारसंहितेच्या कारणामुळे महासभा होणार नसल्यामुळे तूर्तास हे घोंगडे भिजत पडणार आहे. दरम्यान, या पदावर शिवसेनेचा दावा कायम राहणार असून, निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आले तर, सत्तेचा वापर करून महापालिकेवर दबाव निर्माण करण्याची खेळी होणार आहे.

विरोधी पक्षनेतेपद आमचेच..
संख्याबळ जादा असल्यामुळे शिवसेनेचाच विराेधी पक्षनेते पदावर दावा असेल प्रसंगी न्यायालयीन लढाई करून हे पद मिळवले जाईल. मनसे राष्ट्रवादीची मिलीभगत उघड झाल्यामुळे विरोधी पक्षाची खरी जबाबदारी शिवसेनेवरच असेल सत्ताधाऱ्यांच्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी शिवसेना-भाजप संघर्ष करेल. अजयबाेरस्ते, महानगरप्रमुख,शिवसेना