आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक पालिकेत मनसे-अपक्ष युतीमुळे राष्ट्रवादीसमोर संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापौरपदाच्या निवडणुकीत केलेल्या मदतीच्या बदल्यात स्थायी समितीच्या सभापतिपदावर दावा करणाऱ्या राष्ट्रवादीला नवीन अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीने महापौरपदासाठी मदत केली असली तरी सद्यस्थितीत मनसे अपक्ष मिळून सहा सदस्यांची आघाडी सभापतिपद खेचून आणण्यासाठी पुरेशी ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेना भाजपची राज्यात युती असल्यामुळे त्यांच्याकडूनही मदत होण्याची अपेक्षा कमी आहे. या पार्श्वभूमीवर एकतर मनसेवर दबाव वाढवणे किंवा तटस्थ राहणे असे दोन पर्याय त्यांच्यापुढे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

स्थायीवर १६ सदस्य असून, नऊ सदस्य असलेल्या पक्षाकडे सभापतिपद जाते. गेल्या निवडणुकीत भाजपने सभापतिपदावर दावा करून मनसेसोबतची युती तोडल्यावर मनसेने पाच सदस्यांसह अपक्षांचे एक मत खेचून सहा संख्याबळ केले. दुसरीकडे शिवसेना भाजप मिळून पाचचे संख्याबळ झाले. अशीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचीही पाच सदस्यसंख्येमुळे झाली. तिरंगी लढतीत मनसेचा विजय झाला, तरी त्याचे सूत्र राष्ट्रवादीनेच जमवल्याचेही स्पष्ट झाले.
पुढे महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने मनसेला महापौरपद दिले, तर अपक्ष गटनेते गुरमित बग्गांना उपमहापौरपद देऊन अप्रत्यक्षपणे सत्तेतही सहभाग घेतला. आता त्याच्या परतफेडीची अपेक्षा राष्ट्रवादीकडून व्यक्त होत असून, सदस्य निवडीपासून सभापतिपदाच्या तडजोडीची सूत्रे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे सोपवल्याचे समजते. राष्ट्रवादीला सभापतिपदाची अपेक्षा असली, तरी मनसेलाही अर्थवाहिनीच्या चाव्या हातात हव्या आहेत.
गेल्या वेळचा फॉर्म्युला या वेळी वापरला, तर मनसे अपक्ष मिळून सहा संख्याबळ ह ऊन सहज सभापतिपदही मिळू शकते. अपक्ष सत्तेत असल्यामुळे त्यांना मनसेला मदत करणे अपरिहार्य दिसते. या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांना साकडे घालायचे की तटस्थपणे निवडणूक लढायची, असा पेच राष्ट्रवादीपुढे आहे.

राष्ट्रवादीचे दावेदार असे...
समाधानजाधव, सुनीता शिंदे, रंजना पवार, शिवाजी चुंभळे, नीलिमा अामले, उषा अहिरे, छाया ठाकरे, संजय साबळे, विनायक खैरे, कविता कर्डक.