आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nashik Corporation Stopping Water Leckage Through Sms

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक महापालिका पाणी गळती रोखणार एसएमएस द्वारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जलवाहिन्यांतून मोठय़ा प्रमाणात पाणी गळती होत असते. त्याची उशिरा का होईना दखल घेत, महापालिकेने पाणी गळती होणार्‍या ठिकाणाची माहिती फोन किंवा एसएमएसद्वारे कळविण्याचे आवाहन नागरीकांना केले आहे.

आगामी काळात भीषण पाणी टंचाई होण्याचे चिन्ह असल्याने पालिकेपे शहरात विविध ठिकाणी होणारी पाणी गळती रोखण्यासाठी पुढाकार घेत थेट नागरीकांकडूनच गळतीच्या ठिकाणांची माहीती मागविण्यासाठी अधिकार्‍यांचे फोन नंबरच प्रसिध्द केले आहे. राजीव गांधी भवन हे मध्यवर्ती तक्रार निवारण केंद्र म्हणून जाहीर करत 145 किंवा 2563704 या नंबरवर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे. तसेच एसएमएससाठी WLK पाणी गळतीच्या ठिकाणांचा संपूर्ण पत्ता टाईप करून एसएमएस पाठवा.