आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजेवाल्या नानांना उच्च न्यायालयाचीही चपराक; पाेलिसांकडून अटकेची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापक तथा राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, बुधवारी (दि. १४) उच्च न्यायालयानेही शेलार यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्यास नकार देत पुढच्या गुरुवारी पुढील सुनावणी ठेवली अाहे. त्यामुळे शेलार यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याने त्यांच्या अटकेची शक्यता वाढली अाहे.

 
सर्वाेच्च न्यायालयाच्या ध्वनिप्रदूषण राेखण्यासाठीच्या अादेशानुसार नाशिक पाेलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करू नये, यासाठी गणेश मंडळांना सूचना दिल्या हाेत्या. तरीही दंडे हनुमान मंडळाचे संस्थापक म्हणून गजानन शेलार यांनी पाेलिसांनाच अाव्हान देत डीजे वाजविणारच, अशी भूमिका घेतली. त्यानुसार मिरवणुकीत पाेलिसांच्या ध्वनिप्रदूषणाची मर्यादा अाेलांडून थेट ९७.६ डेसिबलपर्यंत अावाज ठेवला हाेता. मिरवणुकीत पाेलिसांनी शेलार यांच्यासह कार्यकर्त्यांना ध्वनिमर्यादा ठेवण्याचे वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने भद्रकाली अाणि सरकारवाडा पाेलिस ठाण्यात शेलार त्यांचा पुतण्या बबलू तथा राहुल शेलार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचबराेबर डीजे जप्त केला हाेता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी शेलारांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता पाेलिसांनी विराेध दर्शविला. न्यायालयानेही शेलार यांनी कायदा हातात घेण्याच्या भूमिकेवर नाराजी दर्शवित अटकपूर्व फेटाळून लावला. त्यानंतर पाेलिसांकडून शेलार यांच्या घराची झडती घेण्यात अाली. त्यांचा शाेध घेऊनही ते हाती लागले नाही. दरम्यान, शेलार यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता न्यायमूर्ती गडकरी यांच्यासमाेर पाेलिसांनी विराेध दर्शविला. त्यामुळे न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व देण्यासही नकार दिला. 
बातम्या आणखी आहेत...