आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक: जाधव-सहाणे प्रकरण; शुक्रवारी सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विधान परिषद निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात अँड. शिवाजी सहाणे यांनी दाखल केलेल्या दाव्यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. यात प्रतिवादी आमदार जयवंत जाधव यांनी नेमलेल्या नव्या वकिलास संबंधित प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी वेळ देत न्यायालयाने पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. 6) ठेवली आहे.

मागील वर्षी 25 मे रोजी विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत अँड. सहाणे यांची चार मते बाद ठरवली गेली. जयवंत जाधव आणि सहाणे या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 221 मते मिळाली, असे सांगून समसमान मतांमुळे निवडणुकीचा निकाल चिठ्ठीद्वारे घोषित करण्यात आला होता. त्यात सहाणे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. या निकालाविरोधात सहाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता, त्यावर जाधव यांनी प्रत्यारोप याचिका दाखल केली होती. मात्र, संबंधित प्रत्यारोप याचिका मुदतीत सादर न केल्याने उच्च न्यायालयाने ही याचिका रद्द केली. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरुद्ध आमदार जयवंत जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करून निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जाधव यांचे हे अपील फेटाळून लावले. 30 ऑगस्टला झालेल्या सुनावणीत आमदार जाधव यांनी नेमलेल्या नवीन वकिलाचा या प्रकरणाविषयीचा अभ्यास पूर्ण व्हावा, यासाठी त्यांनी न्यायालयाकडे विनंती करून वेळ मागितली असता न्यायालयाने पुढील सुनावणी 6 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. यामुळे आता या सुनावणीत काय होते, याकडे लक्ष लागून आहे.