आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचा ‘अागीशी खेळ’, अाैरंगाबाद घटनेनंतर पाहणीसाठी अधिकाऱ्यांची धावपळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - फक्त अाणि फक्त वसुलीच्या नादात असलेल्या महापालिकेच्या विविध कर विभागाचे अग्निशामक दलाचा ना हरकत दाखला नसतानाही फटाके स्टाॅलला परवानगी देऊन बंद केलेले कान डाेळे अखेर शनिवारी अाैरंगाबाद येथील फटाक्यांचा अागडाेंब बघून उघडले. महापालिकेच्या १९३ फटाके गाळ्यांची कर उपायुक्त मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांनी दिवसभर पाहणी केल्यानंतर चक्क १८ गाळेच अग्निशामक व्यवस्थेच्या दृष्टीने परिपूर्ण अाढळले.
या घटनेतून पालिकेचा हलगर्जीपणा तर उघड झालाच, मात्र अग्निशामक दलाची परवानगी नसल्यामुळे वास्तविक कर विभागाने उत्पन्नाएेवजी लाेकांचा विचार करून गाळ्यांची परवानगी रद्द करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात तसे पाऊल उचलण्यामागे नेमकी काेणती उलाढाल हाेती, अशीही चर्चा रंगू लागली अाहे.
शनिवारी अाैरंगाबाद येथे शाॅर्टसर्किटमुळे दाेनशे फटाक्यांची दुकाने जळून खाक झाली. या अागीमुळे संपूर्ण अाैरंगाबाद शहरच नव्हे, तर राज्यभर भीतीचे वातावरण निर्माण झाले. अाैरंगाबाद महापालिकेने अग्निसुरक्षा यंत्रणेबाबत हलगर्जीपणा केल्याचे अाराेप झाले. वास्तविक, नाशिक महापालिकेत तशीच परिस्थिती असल्याचे चार दिवसांपूर्वीच उघड झाले हाेते. महापालिकेने माेठ्या दिमाखात शहरात जवळपास तीनशेहून अधिक ठिकाणी फटाक्यांसाठी जागा लिलावाद्वारे दिल्या. प्रत्यक्षात त्यातील १९३ जागांचेच लिलाव झाले. ज्या जागांचे लिलाव झाले त्यांची बाेलीप्रमाणे शुल्क अाकारून विविध कर विभागाने परवानगी दिली. त्यानंतर गाळे उभारणी करून अग्निशामक उपाययाेजना करून अग्निशामक विभागाची परवानगी सक्तीची हाेती. प्रत्यक्षात यातील अनेकांनी थातूरमातूर अग्निप्रतिबंधक उपाययाेजना केल्या. त्यामुळे अग्निशामक दलाने ना हरकत प्रमाणपत्र नाकारून पाेलिस विभागाला पुढील कारवाईबाबत अहवाल पाठवला, मात्र ना पाेलिस विभागाने कारवाई केली, ना अग्निशामक विभागाने अहवाल पाठवण्याविना अन्य भूमिकाच घेतली नाही. कर विभाग हा महसुलापुरताच मर्यादित असल्याने त्यांनीही डाेळे कान बंद केले. शनिवारी पालिकेने सकाळपासूनच पाहणी सुरू केली. कर विभागाचे उपायुक्त राेहिदास बहिरम अग्निशामक अधिकारी अनिल महाजन या दाेघांनी संयुक्त पाहणी केल्यानंतर केवळ १८ दुकानांमध्येच नियमानुसार अग्निशामक प्रतिबंधक उपाययाेजना केल्याचे अाढळले. त्यांनी पुन्हा एक अहवाल पाेलिसांना पाठवण्याची भूमिका घेतली.
२७ अाॅक्टाेबर राेजीच पाेलिसांना अहवाल
^अग्निशामकपरवानगीनसल्याबाबतचा अहवाल २७ अाॅक्टाेबरलाच पाेलिसांना पाठवला अाहे. पुढील कारवाईचे अधिकार त्यांना असल्यामुळे त्यांच्याकडून कारवाई अपेक्षित हाेती. -अनिलमहाजन, मुख्य अग्निशामक अधिकारी
अहवालटपालात असल्यास त्याबाबत माहीत नाही
^अग्निशामक विभागाकडून कुठल्याही प्रकारचा अहवाल आलेला नाही. टपालात अाला असेल तर माहिती नाही. मनपाकडून संयुक्त कारवाईसाठी काहीच प्रस्ताव नव्हता. फटाके विक्री गाळ्यांबाबत जे चुकीचे आहे ते निदर्शनास आणून द्यावे. कारवाई केली जाईल.पोलिसांची नियमित कारवाई सुरूच आहे. -विजय पाटील, उपआयुक्त, पाेलिस प्रशासन
कर विभागाला विक्रेते अग्निसुरक्षा उपाययाेजनांबाबत जुमानत नाही हे २७ अाॅक्टाेबरलाच माहीत झाले हाेते. प्रत्यक्षात शनिवारी सायंकाळपर्यंत बेशिस्त गाळे विक्रेत्यांना परवानगी नाकारण्याची प्रक्रिया सुरूच हाेती. वास्तविक, अनेक विक्रेत्यांची ७० टक्के फटाके विक्री हाेऊनही गेली हाेती. विशेष म्हणजे, नियमानुसार कारवाई करण्याचे साेडून गाळे विक्रेत्यांची परवानगी रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याचे उपायुक्त राेहिदास बहिरम यांनी सांगितले. मात्र, व्यवसायाचा संबंध बऱ्यापैकी संपल्यामुळे परवानगी रद्द करून त्यांचे हाेणार काय, असा सवाल केला जात अाहे. पुढील कारवाई पाेलिसांमार्फत हाेईल, असा दावा अधिकारी करीत हाेते. एकूणच न्यायालयाचे अादेश असतानाही सुरक्षितेबाबत अधिकारी किती बेफिकीर अाहे, हे अधाेरेखित झाले.

हे करता अाले असते...
मुळात दरवर्षी हा विषय वादाचा असल्यामुळे तसेच लाेकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न बघून एक खिडकी याेजना सुरू करता अाली असती.
निव्वळ महसुलामागे लागता जेथे पालिकेने जागा दिल्या, तेथे अग्निशामक ना हरकत बघूनच प्रत्यक्षात विक्रीला मुभा देता अाली असती.
कर विभाग अग्निशामक विभागाने संयुक्त पाहणी करून नियम पाळणाऱ्यांच्या जागा ताब्यात घेऊन माल जप्त करता अाला असता.
बातम्या आणखी आहेत...