आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइम नाशिक : तरुणाला बेदम मारहाण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भांडणाची कुरापत काढून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणास बेदम मारहाण केली. शेख शहबाज बहाउद्दीन (वय 18) हा मुलतानपुरा भागातून जात असताना तन्वीर मनियार, सोहेल पठाण, निजाम पठाण, जावेद शेख, भैया अत्तार, सर्व राहणार काझीपुरा यांनी फायटरने मारहाण केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉलेजरोडवर दुकान फोडले

कॉलेजरोडवरील सरोजिनी कॉम्प्लेक्स येथील भरवस्तीतील पुमो स्टोअर्स रात्री फोडण्यात आले. दुकानाच्या मागील भिंतीच्या एक्झिट फॅनसाठी असलेल्या बोगद्याची लाकडी जाळी तोडून दुकानातील 70 हजारांचे कपडे, बेल्ट, पाकिटे आणि 20 हजारांची रोकड लंपास केली. दुकानाचे व्यवस्थापक संदीप बागुल यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेस मारहाण : पाच ते सहा जणांच्या जमावाने महिलेला घरात घुसून मारहाण केल्याची घटना पाथर्डीफाटा येथे घडली. रेखा विनोद नाठे (रा. साईलीला रो-हाउस, प्रशांतनगर) या घरात असताना रामा जुंद्रे, त्यांची पत्नी वैशाली नाठे, सुनीता नाठे यांच्यासह पाच ते सहा जणांनी घरात घुसून भाऊ हिरामण भोर आणि आपल्याला मारहाण केल्याची तक्रारी दिली आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.