आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुटीच्या 3 घटना : बळजबरीने घेतला धनादेश, कार पळवली, ट्रकचालकाला लुटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
चाेरट्यांचे वाढले धाडस, पाेलिसांना अाव्हान 
नाशिक - शहरात लुटमारीच्या घटना सुरूच असून इंदिरानगरात बेल वाजवून फ्लॅटचे दार उघडताच वृद्धेची साेनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच गुंतवणूकदाराने घरात घुसून कंपनी संचालकास मारहाण, कारमधील एेवज कारसह पळविणे ट्रक अडवून लूट करण्याचा प्रकार घडल्याने चाेरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसत अाहे. 
 
- सोलापूर येथील गुंतवणूकदाराचा संताप
गुंतवलेली रक्कम देण्यास नकार, संचालकास घरात घुसून मारहाण 
गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळाली नाही तर गुंतवणूकदारांकडून काय घडेल, याचा नेम नाही. सांगोला (जि. सोलापूर) येथील एका गुंतवणूकदाराने नाशिकमधील एका इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. गुंतवणूक रक्कम देण्यास विलंब होत असल्याने या गुंतवणूकदाराने संचालकाच्या घरात घसून कोऱ्या चेकवर सह्या घेत घराबाहेर उभी केलेली कार घेऊन पलायन केले. गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी वाजता गंगापूररोडवर हा प्रकार घडला. 
 
याप्रकरणी विनायक अरविंद कोरडे (रा. चैतन्यनगर, गंगापूररोड) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी घरी असताना संशयित सागर येलपेले (रा. सांगाेला, जि. सोलापूर) हा आणि त्याचे दोन साथीदार बळजबरीने घरात आले. बेडरूममध्येे नेत बळजबरीने कोऱ्या चेकवर सह्या घेत ह्युंडाई कारची (एमएच १५ एफटी १२८३) चावी बळजबरीने घेऊन कार घेऊन पसार झाले. पोलिसांनी याबाबत कोरडे यांना अधिक माहिती विचारली असता कंपनीमध्ये येलपेले यांनी गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीचे १८ लाख रुपये परत दिले आहेत. संशयित आणखी पैशांची मागणी करत होता. पैसे देण्यास विलंब झाल्याने त्याने घरात घुसून बळजबरीने कोऱ्या चेकवर सह्या घेत कार घेऊन ते पसार झाले. याप्रकरणी शुक्रवारी (दि. १) गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांशी पोलिसांनी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांनाही ‘काय करायचे ते करून घ्या’ असे सांगत फोन बंद केल्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश देवीकर यांनी सांगितले. संशयिताला ताब्यात घेण्यासाठी एक पथक सांगोला येथे पाठवले आहे. 
 
- पाठलाग करत रिक्षाने राेखला ट्रक 
सावरकर उड्डाणपुलावर तिघांनी जालन्याच्या ट्रकचालकाला लुटले 
रिक्षाने ट्रकचा पाठलाग करत त्यानंतर ट्रकपुढे रिक्षा उभी करून रिक्षातील तिघांनी ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील चार हजार रुपयांची रक्कम लुटण्यात आली. शुक्रवारी (दि. १) दुपारी वाजता स्वा. सावरकर उड्डाणपुलावर हा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
याप्रकरणी अादिनाथ भुसारे (रा. जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ट्रक (एमएच २३ डब्ल्यू ८०५१) ने दुपारी स्वा. सावरकर उड्डाणपुलावरून पुण्याकडे जात असताना पाठीमागून पांढऱ्या रंगाची रिक्षा आली. अचानक ट्रकपुढे रिक्षा उभी केली. ब्रेक लावत ट्रक उभा केला असता रिक्षातील तिघे बळजबरीने ट्रकच्या कॅबिनमध्ये घुसले. एकाने गळ्याला चाकू लावत खिशातील हजारांची रक्कम काढून घेत मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी देत तिघे फरार झाले. सिन्नर फाटा येथे पोलिसांना या प्रकाराची माहिती चालकाने दिली. नाशिकरोड पोलिस याप्रकरणी गुन्हा दाखल केला अाहेे. 
 
पुढील स्लाइडवर, चालकाला चाकूचा धाक दाखवत कार पळवली, सुदैवाने चीनचा पर्यटक बचावला... 
बातम्या आणखी आहेत...