नाशिक - देशभरातील लाखाे गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मैत्रेय प्लाॅटरर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीच्या मुख्य संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्या पाेलिस काेठडीत साेमवारी न्यायालयाने अाणखी सात दिवसांची वाढ केली. त्यांनी मैत्रेयच्या नावाने वेगवेगळ्या सहा कंपन्या स्थापन केल्या असून या कंपन्यांची तब्बल १२५ बँक खाती असल्याचे पाेलिस तपासात उघडकीस अाले. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वीच सेबीने या कंपनीला गुंतवणूकदारांकडून रकमा न स्वीकारण्याचे अादेश दिले हाेते, मात्र हे अादेश धाब्यावर बसवत संचालकांनी वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे काेट्यवधींच्या रकमा जमा केल्या.
मैत्रेय कंपनीत गुंतवणूक केल्यास विशिष्ट क्षेत्रफळाचा प्लाॅट खरेदी करून िदला जाईल, असे अामिष कंपनीकडून दाखवले जात हाेते. मात्र, अनेक ग्राहकांना प्रत्यक्षात खरेदी पत्रही मिळाले नाही. मुदत संपूनही गुंतवलेली रक्कम व व्याज मिळालेले नाही. त्यामुळे अखेर ठेवीदारांनी कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर अाणि संचालक जनार्दन परुळेकर यांच्याविरुद्ध तक्रार िदली. त्यानुसार शुक्रवारी सत्पाळकर यांना अटक करण्यात अाली, तर परुळेकर मात्र फरार अाहे. मैत्रेय कंपनीस सेबीने सन २०१३ मध्येच गुंतवणुकीच्या याेजना बंद करून रकमा न स्वीकारण्याचे अादेश िदले हाेते, परंतु कंपनीने वेगवेगळ्या सहा कंपन्या स्थापन करून त्यांची १२५ बँक खाती उघडली. त्याद्वारे गुंतवणुका स्वीकारल्या. तसेच कंपनीच्या महाराष्ट्राबाहेरही शाखा अाहेत का, कुठे व किती गुंतवणूक केली याची माहिती मिळणे अावश्यक असल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयास सांगितले.
सर्व कंपन्यांचे दाेनच संचालक
मैत्रेयच्या कंपन्यांचा विस्तार अाणि अब्जावधींची मालमत्ता खरेदी करताना कंपनीने ज्या वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केल्या अाहेत अाणि त्यांची नाेंदणी करताना जे घाेषणापत्र िदले अाहे त्यात मुख्य संचालक वर्षा सत्पाळकर अाणि जनार्दन परुळेकर या दाेघांचीच नावे अाहेत. त्यांच्याच सर्व मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती समाेर अाली अाहे. अाराेपींच्या वकिलांनी मात्र महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षक कायदा लावण्यावर जाेरदार अाक्षेप घेतला तसेच काेठडी वाढवण्याच्या मागणीला विराेध केला.
गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ
या तपासात पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन गांभीर्याने लक्ष घालत अाहेत. अायुक्तांनी सीबीअायच्या अार्थिक गुन्हे शाखेत अनेक घाेटाळ्यांचा यशस्वी तपास केला अाहे. त्या अनुभवानुसार या गुन्ह्यात भादंिव १२० ब अन्वये कट रचणे, महाराष्ट्र चिट फंड अॅक्टसारखी कलमे वाढवली अाहेत. त्यासाठी काेर्टाची परवानगीही घेतली अाहे.
बंदाेबस्तामुळे एजंट गायब
सत्पाळकर यांना शुक्रवारी अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ मैत्रेयच्या अनेक एजंटांनी नाशिक न्यायालयाच्या अावारात घाेषणाबाजी करीत पेालिसांचा निषेध करत धुडगूस घातला हेाता. या पार्श्वभूमीवर साेमवारी वाढीव पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाल्याने एजंट न्यायालय परिसरात फिरकले नसल्याचे चित्र दिसून अाले.