आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तोतया पोलिसांनी लुटले साईभक्तांना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - दुचाकीवरून शिर्डीला दर्शनासाठी जाणार्‍या चार साईभक्तांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत दोन तोतया पोलिसांनी एक लाखाहून अधिक रकमेचा ऐवज लुटला. शिर्डी रस्त्यावर भोकणी फाट्यालगत शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही लूट झाली.

कांदिवलीतील अनिलकुमार माताप्रसाद विश्वकर्मा (वय 37) यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिसांत दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिलकुमार विश्वकर्मा, अशोक यादव, रमेश विश्वकर्मा आणि रामेंद्र विश्वकर्मा हे दोन दुचाकींवरून शिर्डीकडे जात होते. देवपूर फाट्याजवळ मागून दुचाकी(एमएच 15, डीजे-7584)वरून आलेल्या दोघांनी पोलिस असल्याचे सांगून अनिलला गाडी थांबवण्यास सांगितले. तुमच्या दुचाकीमुळे अपघात होऊन काही लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे तुम्ही पोलिस ठाण्यात चला, असे सांगून त्यांना जुन्या भोकणी फाट्याजवळ बोलवत चाकूचा धाक दाखवला. तसेच विश्वकर्मा यांना पुढे गेलेल्या दोघा साथीदारांना भ्रमणध्वनी करून मागे बोलावण्यास सांगितले. त्यानंतर चारही साईभक्तांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत त्यांच्याजवळील एक तोळ्याची सोन्याची अंगठी, दोन तोळ्याची चैन, तीन भ्रमणध्वनी आणि रोख रक्कम काढून घेत या तोतया पोलिसांनी पोबारा केला. तोतया पोलिसांकडे असलेल्या दुचाकीचा क्रमांक साईभक्तांनी पोलिसांना दिला आहे.