आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यपी वडिलांचे कु-हाडीने तुकडे करून पेटवून दिले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दारू पिऊन सतत मारझोडीने त्रस्त झालेल्या मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात कु-हाडीने वार करून नंतर डिझेल टाकून त्यांना जाळून टाकल्याची खळबळजनक घटना लासलगावजवळील मरळगोई येथे घडली. एक आठवड्यानंतर मुलानेच पोलिसांकडे जाऊन वडील हरविल्याची तक्रार दाखल केल्यानंतर झालेल्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मरळगोई खुर्द येथील पाचोरे शिवारात बाळू लक्ष्मण खेलूकर (45) हे दोन मुले व एका मुलीसह राहत होते. बाळू दारूच्या आहारी गेले होते. तसेच त्यांची दोन लग्न झालेली होती. दारू पिऊन मुलांना ते नेहमी मारझोड करायचे. या छळाला कंटाळून मुलगा संतोष (19) आपल्या भावा-बहिणीसह गोंदेगावला मामाकडे राहत होता. ६ जानेवारीला बाळू खेलूकर हे दारू पिऊन गोंदगावला गेले व भांडण करू लागले. तेव्हा संतोष वडिलांना घेऊन मरळगोई येथे आला. येथेही दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात संतोषने कु-हाडीने वडिलांच्या डोक्यात व पायावर वार करून त्यांचा खून केला. नंतर घराला कुलूप लावून तो पुन्हा गोंदेगाव येथे निघून गेला. ७ जानेवारीला वडील मृत झाल्याची खात्री करून तो पुन्हा निघून गेला. ८ जानेवारीला डिझेल आणून त्याने घरामागील पडवीत मृतदेह पेटवून दिला. दोन दिवसांनी त्याने वडिलांची हाडे गोणीत भरली व नदीत फे कून दिली. त्यानंतर 18 जानेवारीला पोलिस ठाण्यात त्याने वडील हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान, पोलिसांनी पाहणी केली असता तेथे घटनास्थळी हाडे सापडल्याने संशय बळावला होता.