आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Crime Wife Murder And Then Husband Sucide

नाशकात मुख्याध्यापक पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कौटुंबिक वादातून मुख्याध्यापक पत्नीची हत्या करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी नाशकातील इंदिरानगर येथे घडली. दिलीप तावरे हा रिक्षाचालक असून त्याची पत्नी रेखा या इगतपुरी तालुक्यातील शेनवाडे येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका आहेत. दिलीप व रेखा यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. शनिवारी दुपारी रेखा स्वयंपाक करत असताना दिलीपने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यात त्या जागीच ठार झाली. त्यानंतर दिलीपने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काही वेळाने दिलीपची आई यमुना घरात आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. घटनेनंतर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, दिलीप हा चारित्र्यावरून संशय घेऊन त्रास देत असल्याची तक्रार रेखा यांनी पोलिसांना फॅक्सद्वारे दिली होती. पोलिस त्यादृष्टीने आता तपास करत आहेत.