आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIVE रिपोर्ट : भावी शिक्षिकांची वर्गासाठी फरफट..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्यांना बळजबरीने खेचत वर्गाबाहेर नेताना विद्यार्थिनींच्या विरोधाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. विद्यार्थिनींनी केलेली विनंतीही झिडकारण्यात आली. खाकीपुढे हताश भावी शिक्षिकांची हक्काच्या वर्गासाठी सायंकाळपर्यंत फरफट सुरू होती.

अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांची भेट घेतल्यानंतर जलद तोडगा निघण्याची शक्यता कमीच असल्याचे स्पष्ट झाल्याने हतबल झालेल्या विद्यार्थिनींनी शाळेतच ठाण मांडत लोकशाही मार्गाने न्याय मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. विद्यालयाच्या प्राचार्या सरोज जगताप यांना पोलिस एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे फरफटत नेत असताना मुलीही तेवढय़ाच ताकदीने विरोध करत असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळी साडेसहापर्यंत निरीक्षक व उपनिरीक्षकांकडून तिढा सुटत नसल्याने उपायुक्त साहेबराव पाटील व सहाय्यक आयु्क्त गणेश शिंदे आले. प्राचार्य, विद्यार्थिंनीसोबत चर्चा सुरू केली. मात्र, सकाळपासून अन्न-पाण्याचा एक कणही पोटात न गेल्याने चार मुलींना सात वाजेच्या सुमारास त्रास होऊन त्या बेशुद्ध पडल्या. मैत्रिणींनी जवळच्याच वर्गात नेऊन त्यांना झोपवले. रुग्णवाहिका आल्यानंतर महिला पोलिसांनी एकीस कडेवर घेऊन मुलींना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भावनिक वातावरण तयार झाले. रात्री आठच्या दरम्यान मुलींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.