आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास अाराखडा एप्रिलमध्ये हाेणार जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दीड वर्षापासून प्रतिक्षेत असलेला बांधकाम क्षेत्राची काेंडी फाेडण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जाणारा विकास अाराखडा नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अाचारसंहितेच्या कात्रीत अडकला असून अाराखडा जाहीर हाेण्यासाठी महापालिका निवडणुकीनंतर म्हणजेच एप्रिलची वाट बघावी लागणार अाहे. दाेन दिवसांपूर्वी विकास अाराखड्याची फाइल मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्यामुळे बांधकाम क्षेत्रासह सर्वच नाशिककरांच्या पल्लवित झालेल्या अाशांवर विरजण पडले असून, मीटरखालील रस्त्यांवरील टीडीअार बंदी उठवण्याबाबत ठाेस निर्णय नसल्यामुळे त्याचा फटका महापालिका निवडणुकीत बसण्याची भीती लक्षात घेत जाणीवपूर्वक अाचारसंहिता जाहीर हाेण्यापूर्वी फाइल मंजुरीची खेळी खेळली गेल्याची चर्चाही सुरू झाली अाहे. 

२० वर्षांच्या नियाेजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण विकास अाराखडा विकास नियंत्रण नियमावलीची अनेक वर्षापासून प्रतीक्षा अाहे. यापुर्वी १९९५ मध्ये विकास अाराखडा जाहीर झाला हाेता. त्यानंतर शहराचा दुसरा विकास अाराखडा गेल्याच वर्षी मंजूर हाेईल असे चित्र हाेते, मात्र नानाविध कारणामुळे त्यात खंड पडत गेला. मध्यंतरी राष्ट्रवादीचे अामदार जयवंत जाधव यांनी विधान परिषदेत विकास अाराखडा जाहीर हाेण्यास झालेला विलंबाबाबत हक्कभंग दाखल करण्याचा इशाराही दिला. मात्र, त्यानंतरही विकास अाराखडा जाहीर झाला नव्हता. गेल्या तीन वर्षांपासून शहरातील बांधकाम क्षेत्र कपाटाच्या मुद्यावरून ठप्प अाहे. त्याबराेबरच नऊ मीटरखालील रस्त्यांना टीडीअार अनुज्ञेय नसल्यामुळे सामान्य नाशिककरांबराेबरच छाेटे बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले हाेते. दरम्यान, नवीन विकास अाराखडा विकास नियंत्रण नियमावलीत कपाट टीडीअारवरील निर्बंध उठण्याची अाशा हाेती. खासकरून बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर नवीन वर्षात विकास अाराखडा जाहीर हाेईल अशी अपेक्षा हाेती. त्यानुसार मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी अाराखड्याच्या फाईलवर सही केल्याने गुरुवारी राजपत्र प्रसिद्ध हाेऊन अाराखडा जाहीर हाेईल अशी अटकळ हाेती. मात्र, बुधवारी पदवीधरची अाचारसंहिता लागल्याने नाशिककरांची निराशा झाली. सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे नऊ मीटरखालील रस्त्यांवरील टीडीअारचे निर्बंध उठवण्याबाबत विकास अाराखड्यात ठाेस याेजना नसल्याने अाराखड्याची फाइल अाचारसंहिता लागण्याची शक्यता गृहित धरून मंजूर केली गेली. जेणे करून अाराखड्यावर अाम्ही सही केली मात्र अाचारसंहिता लागली असे कारण करून भाजपला थाेडासा अवधी मिळवता अाला. टीडीअारवरील निर्बंध कायम राहिले कपाटाचा प्रश्न सुटल्यास पालिका निवडणुकीत त्याचा फटका बसेल या विचारातूनही शक्कल लढवली गेल्याचे बाेलले जात अाहे. 

एसटीचा प्रस्ताव धुडकावला 
१०८ काेटीचा खर्च पेलवत नसल्याचे सांगत पालिकेने शहर बससेवा चालवावी असा प्रस्ताव एसटी महामंडळाने दिला हाेता. मात्र पालिकेने विधान परिषद निवडणुकीची अाचारसंहिता लागल्याने धाेरणात्मक निर्णय घेता येणार नाही असे कारण देत प्रस्ताव धुडकावला. अायुक्त कृष्णा यांनी अाचारसंहिता संपल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केला. 
बातम्या आणखी आहेत...