आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- नामको बँकेने जिल्हा बँकेतून 64 कोटी, राजलक्ष्मी बँकेने 2 कोटी 40 लाख रुपयांच्या ठेवी काढल्या आहेत. सर्मथ बँकेनेही जिल्हा बॅँकेतून काही रक्कम काढल्याची चर्चा आहे.
आपल्या नियमित गरजांसाठी बँकांनी या ठेवी काढल्याचे जिल्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांचे म्हणणे आहे. मात्र विधानपरिषदेत राज्यमंत्री प्रकाश सोळंके यानी बँकेतील गैरव्यवहाराबाबत संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याचे संकेत आणि संचालक मंडळावर बरखास्तीची टांगती तलवार ही स्थिती पाहता विड्रॉल झालेल्या या ठेवींबाबत सहकार वतरुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. बँकेतील एकूण व्यवहाराबाबत आमदार जयवंत जाधव यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता.
चर्चेमुळे ठेवी काढल्या
जिल्हा बँकेबाबतच्या विधानपरिषदेपर्यंतच्या चर्चांमुळे आम्ही 2 कोटी 40 लाखांची रक्कम काढून घेतली आहे.
-डॉ. राहुल आहेर, चेअरमन, राजलक्ष्मी बँक
स्थिती सुधारणार
बँकेचे संचालक मंडळ लवकरच बरखास्त होईल. त्यानंतर मात्र स्थिती सुधारणार आहे.
-माणिकराव कोकाटे, संचालक, जिल्हा बँक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.