आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्हा बँकेच्या ५० लाखांच्या रकमेवर दरोडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंदरसूल येथील शाखेत रिक्षातून नेण्यात येत असलेल्या पन्नास लाखांच्या रकमेवर मंगळवारी भरदिवसा दरोडा पडला. पल्सरवरील दोघांनी रिक्षातील तिघांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकत ही रक्कम लूटून नेली. दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री तालुक्यातील अंगुलगाव येथे गेल्या अकरा दिवसांतील सहावा दरोडा पडण्यास १२ तास उलटत नाही, तोच ही घटना घडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

गेल्या चार दिवसांच्या सलग सुट्यानंतर आज बँकांचे व्यवहार सुरळीत होताच दरोडेखोरांनी बँकाच्या रकमेवरच दरोडा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या खरीप हंगामातील पीककर्जांचे वाटप विविध सहकारी संस्थामार्फत केले जात असल्याने अंदरसूल येथील बँकेच्या शाखेत ५० लाख रुपयांची रक्कम अंदरसूल येथील बँकेचे शाखाधिकारी रामदास महाले, शिपाई लहानू भारती हे रिक्षातून घेऊन जात होते. जिल्हा बँकेच्या मार्केटयार्ड या मुख्य शाखेकडे महाले यांनी १ कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु लक्ष्मीनारायण रस्त्यावरील बँकेच्या शाखेत ५० लाख रुपयेच शिल्लक असल्याने अंदरसूल शाखेला ५० लाख रुपये अदा करण्यात आले. महाले यांनी ही रक्कम नेण्यासाठी भाड्याची अॅपे रिक्षा ठरवली. यानंतर ही रक्कम बारदानाच्या गोणीत भरून महाले व भारती रिक्षाचालक अमोल वाकचौरेसह निघाले. येवला- अंदरसूल रस्त्यावरील गाडे पेट्रोलपंपासमोर रिक्षा येताच पाठीमागून पल्सरवर मोटारसायकलवरून येणा-या दोघांनी त्यांना अडवत ही रक्कम लुटून नेत औरंगाबादच्या दिशने पोबारा केला.