आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदवड तालुक्यातील राहुड घाटात कंटेनरला एसटी बसची धडक; 13 प्रवासी जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदवड:  तालुक्यातील राहुड घाटात मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावकडे जाणाऱ्या कंटेनरला भरधाव वेगाने जाणाऱ्या नाशिक-खामगाव एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील 13 प्रवासी जखमी झाले. जखमींवर चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. गुरुवारी (दि. 25) सकाळी 8-30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. चांदवड बाजूकडून मालेगावकडे जाणाऱ्या कंटेनरला (क्र. एचआर 38 व्ही 2673) चांदवड तालुक्यातील राहुड घाटात गुरुवारी सकाळी 8-30 वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारी नाशिक-खामगाव ही एसटी बसने (क्र. एमएच 40 वाय 5476) पाठीमागून जोरदार धडक दिली. 
 
या अपघातात बसमधील पद्माकर दत्तात्रय कुलकर्णी (81, अकोला), शिवाजी मधुकर पाटील (40, अमळनेर), वत्सला निवृत्ती साळवे (65, चांदवड), सुधीर दत्तात्रय कुलकर्णी (70, मलकापूर), सुरेश निवृत्ती साळवे (45, चांदवड), हिमांशु शिवाजी पाटील (9, अमळनेर), अनुष्का शिवाजी पाटील (11, अमळनेर), अलका रवींद्र देसाई (40, झोडगे), रेखा शिवाजी पाटील (37, अमळनेर), सुरेश जगन्नाथ टुले (50, जळगाव), शालिनी मधुकर देशपांडे (75, जळगाव), सुधाकर दत्तात्रय कुलकर्णी (81, शेगाव), सोनाली मिलींद जाधव (26, नाशिक) हे 13 प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी सोमा कंपनीच्या व 108 रुग्णवाहिकेने धाव घेऊन जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे जखमींवर उपचार करण्यात आले. या अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत बसचालकाविरुद्ध चांदवड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. ए. एस. फुलमाळी करीत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...