आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात जनजीवन पूर्वपदावर; शहरातील सर्व व्यवहार सुरळीत, ३२ समाजकंटकांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तळेगावचच्या घटनेनंतर नाशिक शहरात चार दिवसांपासून असलेले तणावाचे वातावरण गुरुवारी निवळले असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. विविध भागांतील व्यवहार सुरळीत झाले आहेत. पोलिस यंत्रणेच्या सतर्कतेमुळे शहरात किरकोळ प्रकार वगळता एकही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, शहरातील विविध पोलिस ठाण्यांत १९ गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील ११ गुन्हे उघड झाले आहेत, तर ३२ समाजकंटकांना अटक करण्यात आली. यात एकूण ६८ संशयितांमध्ये आजी, माजी नगरसेवकांसह काही संघटनांच्या पुढाऱ्यांची नावे आहेत.
शनिवारी तळेगाव येथे पाचवर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर रविवार सकाळपासून ग्रामीण भागांत तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली. नंतर याचे लोण नाशिकपर्यंत पोहोचले. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न करत समाजकंटकांच्या मुसक्या आळवल्या. चार दिवस पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्यासह पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, अतुल झेंडे, सचिन गोरे आणि १३ पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक दिवस-रात्र रस्त्यावर उभे होते. आयुक्त डॉ. सिंघल यांनी दोन्ही समाजांच्या नेत्यांशी सतत संपर्क साधून दोन दिवस संयुक्त बैठका घेत वातावरण शांत करण्याचे प्रयत्न केले. समाजकंटकांवर धडाकेबाज कारवाई करत शहरातील वेगवेगळ्या भागांतून ३२ समाजकंटकांना अटक केली. ६८ संशयितांचे नावे निष्पन्न झाली आहेत. संशयितांमध्ये काही आजी-माजी नगरसेवकांसह संघटनांच्या पुढाऱ्यांची नावे समोर आली आहेत.
दंगल रोखण्यात पोलिसांना यश
सोमवार आणि मंगळवारी शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी पेट्रोलिंग करत शांततेचे आवाहन केले. त्यामुळे संवेदनशील भागात वेळीच कारवाई झाल्याने शहरात मोठी दंगल रोखण्यास पोलिस यंत्रणेला यश आले. या कारवाईने भारावून न जाता शहरात सर्वच ठिकाणी बंदोबस्त कायम ठेवण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला. चार दिवसांचे कटू अनुभव वगळता गुरुवारी शहरात सर्व ठिकाणी जनजीवन पूर्वपदावर आले.
सिन्नर तालुक्यात २० अटकेत
सिन्नर | तळेगाव (अंजनेरी) येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करत टायरची जाळपोळ केल्याप्रकरणी व जमावबंदी अादेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी तालुक्यातील सोनांबे आणि कोनांबे या गावातील २० तरुणांना अटक केली. दरम्यान, न्यायालयाने या सर्व संशयितांची जामिनावर सुटका केली.
बातम्या आणखी आहेत...