आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार जागृतीच्या साहित्याची गरज -शिवसेना संपर्क नेते मिर्लेकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - कामगार शक्तीत अफाट सार्मथ्य आहे. कामगारांमुळेच महाराष्ट्राला मुंबई मिळाली आहे. मात्र, सद्यस्थितीत कामगारांमध्ये व्देष पेटविणारे नेतृत्वच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे शासनानेही कामगारांसाठी पोषक कायदे तयार केलेले नाहीत. उद्याचा कामगार जगविण्यासाठी कामगारांना जागृत करणार्‍या साहित्याची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी व्यक्त केले.

इमेज मेकर्स असोसिएशनतर्फे सातपूरच्या कामगार कल्याण भवन येथे जिल्हास्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन मिर्लेकर यांच्या हस्ते झाले. कॉम्रेड जे. पी.डांगे यांनी अहोरात्र कामगारांसाठी प्रयत्न केले होते. विधानसभेत तासन्तास त्यांनी कामगारांची बाजू मांडली. त्यामुळेच सरकारला झुकावेदेखील लागले होते. आज मात्र कामगारांना चांगले नेतृत्व लाभत नाही, अशी खंतही मिर्लेकरांनी या वेळी बोलून दाखविली. कामगारांची ही परिस्थिती बदलायची असेल तर कामगार साहित्य त्यासाठी खरोखरच खूप पूरक ठरेल. त्यामुळेच साहित्यिकांनी कामगारांना जागृत करणारे साहित्य निर्माण करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नितीन भोसले, कामगार उपायुक्त आर. एस. जाधव, नगरसेवक सलीम शेख, नगरसेविका उषाताई शेळके, अजय बोरस्ते, व्हीआयपीचे उपमहाव्यवस्थापक राजीव राऊत, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, तसेच यशोवर्धन बारामतीकर, कैलास अहिरे, उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष विलास शिंदे व इमेज मेकर्स असोसिएनचे अध्यक्ष रवींद्र एरंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संमेलनाचे अध्यक्षस्थान साहित्यिक मनोहर विभांडीक यांनी भूषविले.

पाच कामगारांना ‘श्रम गौरव’
या वेळी कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कैलास तांदळे, विलास काकडे, हेमंत पाटील, अशोक सिंधकर व गोविंद बोरसे या पाच कामगारांना मान्यवरांच्या हस्ते श्रमगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.