आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्चस्व राखले: जिल्हा नियोजन समितीवर पुन्हा ‘नाशिक पॅटर्न’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस-शिवसेना आणि रिपाइं या महाआघाडीच्या नाशिक पॅटर्नने 14 पैकी 7 जागा मिळवित वर्चस्व राखले. तर मनसे-भाजप-तिसरा महाजला सहा जागांवर समाधान मानावे लागले. मालेगाव आघाडीस एक जागा मिळाली.

40 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली. त्यात जि.प.च्या 25 आणि नगरपरिषदेची एक अशा 26 जागा अविरोध झाल्या. उर्वरित 14 जागांसाठी सोमवारी निवडणूक झाली. त्यात 13 मोठय़ा नागरी गटासाठी (मनपा कार्यक्षेत्र) आणि एका लहान नागरी गटाच्या (नगरपरिषद) जागांचा समावेश आहे. सकाळी 8 वाजेस जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मतमोजणी झाली. दीड तासातच निकाल जाहीर झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि सहायक निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी काम पाहिले.

निकाल खालीलप्रमाणे (कंसात मिळालेली मते व पक्ष)
प्रवर्ग (पक्ष) विजयी उमेदवार
अ.जा. (स्त्री) ताराबाई म्हसदे (68, शिवसेना)
ओबीसी(स्त्री) मीनाबाई काकळीज (67, शिवसेना) शीतल भामरे (70, मनसे)
ओबीसी एजाज अहमद मो. उमर (104, तिसरा महाज) सलीम शेख (83, मनसे)
सर्वसाधारण (स्त्री) अतिया बानो जलील अहमद (57, तिसरा महाज) रुपाली गावंड (42, राष्ट्रवादी), शोभा फडोळ (33, शिवसेना), सुरेखा भोसले (59, मनसे)
सर्वसाधारण डॉ. राहुल आहेर (58, भाजप), मदन गायकवाड (62, मा.वि.आ.), उत्तम दोंदे (36, शिवसेना), दिनकर पाटील (32, कॉँग्रेस)
लहान नागरी गट (सहा नगरपरिषदांच्या दोन जागांसाठी झाली निवडणूक)
सर्वसाधारण सचिन दराडे (90, राष्ट्रवादी, मनमाड)

यांची झाली अविरोध निवड
राष्ट्रवादी : विजयर्शी चुंबळे, उषा बच्छाव, माधुरी बोरसे, इंदुमती खोसकर, सुजाता वाजे, मंदाकिनी बनकर, संगीता ढगे, शैलेश सुर्यवंशी, कृष्णराव गुंड, विलास माळी
कॉँग्रेस : केरू पवार, सोमनाथ फडोळ, संदीप गुळवे, निर्मला गिते, कल्पना सुर्यवंशी
शिवसेना : प्रवीण जाधव, स्मिता बिवाल, हेमलता गावीत, चंद्रकांत वाघ, सुरेश पवार, भावना भंडारी
भाजप : मनिषा बोडके,
माकप : प्रशांत देवरे
मनसे : सुधाकर राऊत

सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला
महाआघाडीस 30 जागा मिळाल्या. त्यात मनसे-भाजप-तिसरा महाज यांना आठ जागांवर समाधान मानावे लागले. सर्वाधिक 13 जागा राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेनेला 10 आणि कॉँग्रेसला सात जागा मिळाल्या, तर मनसेला चार, भाजपला दोन, तिसरा महाजला दोन आणि माकपा व मालेगाव विकास आघाडी यांना प्रत्येकी एक जागा मिळविण्यात यश आले.