आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’चा आज वर्धापनदिन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या तीन वर्षांपासून नाशिककरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या ‘दैनिक दिव्य मराठी’चा वर्धापनदिन गुरुवारी (दि. 3) साजरा होत आहे. माहितीप्रद आणि वैशिष्ट्यपूर्ण बातम्यांमुळे वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या दैनिकाच्या वर्धापनदिनानिमित्त पंधरवडाभर आयोजित केलेल्या ‘दिव्य मराठी’ उत्सवाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

‘आता चालेल तुमची मर्जी’ असा विश्वास देत ‘दिव्य मराठी’ने नाशिकमध्ये धडाक्यात आगमन केले. बातम्यांचा वेगळेपणा, समस्येला थेट हात घालत तिच्यावर उपाय सुचवण्याची हातोटी, स्थानिक घटनांसह राष्टÑीय व आंतरराष्टÑीय घडामोडींची इत्थंभूत आणि विश्लेषणात्मक माहिती पुरवत जगाच्या कानाकोप-यातील बातम्यांमधून वाचकाला सदैव ‘अपडेट’ ठेवण्याचा वसा ‘दिव्य मराठी’ने घेतला. त्यामुळेच नाशकात दाखल झाल्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून अग्रस्थानी कायम राहत ‘दिव्य मराठी’ने नाशिककरांच्या मनात विशेष स्थान प्राप्त केले.

यंदाच्या ‘दिव्य मराठी उत्सवा’तून नाशिककरांना खास कार्यक्रमांची मेजवानी पेश करण्यात आली. यशस्वी महिला उद्योजिकांशी मुक्त संवाद, प्रसिद्ध व्यवस्थापन गुरू डॉ. एन. रघुरामन यांचा ‘मॅनेजमेंट फंडा’, ‘जय जय गौरीशंकर’ हे संगीत नाटक, ‘करून गेलो गाव’ हे विनोदी नाटक या सर्वच कार्यक्रमांना नाशिककरांनी उदंड प्रतिसाद देत ‘दिव्य मराठी’बद्दल आत्मीयता प्रकट केली.
सायंकाळी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन
वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत तुपसाखरे लॉन्स, मुंबईनाका येथे स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी ‘दिव्य मराठी’ परिवारातर्फे वाचक व नाशिककरांना आमंत्रित करण्यात आले आहे.