आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या डॉक्टरला सुगंधी पाण्याचे पेटंट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पिण्याच्या पाण्याला आवडत्या फळांचा किंवा फुलांचा सुगंध आला तर ... असा विचार नाशिकचे डॉ. विक्रम काळे यांच्या मनात आला आणि त्या दृष्टीने त्यांनी संशोधनास प्रारंभ केला. या अभिनव कल्पनेचे पेटंट नुकतेच बौध्दिक संपदा विभागाकडून त्यांना मिळाले असून, भविष्यात अशा सुगंधी पाण्याचा प्रकल्प उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

जी बालके पाणी पिण्यास टाळाटाळ करतात त्यांना हे सुगंधी पाणी निश्चित आवडेल. हे पाणी त्यांच्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आजार टाळण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच ते सर्वार्थाने नैसर्गिक पाणीच असल्याने बालकांना कोणताही अपाय होणार नाही, असा डॉ. काळे यांचा दावा आहे. आइस्क्रीम आणि आइसकँडीमध्ये या नैसर्गिक फळा-फुलांचा सुगंध असलेले पाणी वापरल्यास त्या सुगंधालादेखील अधिक पसंती मिळू शकते, असे काळे यांनी म्हटले आहे.