आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनमुक्तीसाठी ‘महावितरण’चा सूक्ष्म कृती आराखडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - भारनियमनमुक्तीचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने नाशिक परिमंडळाने ठोस पावले उचलली असून, त्यासाठी एक सूक्ष्म कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्याअंतर्गत कनिष्ठ अभियंता व उपकार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकार्‍यांची प्रत्येक वाहिन्यांवर फिडर मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर क, इ, ग या गटातील प्रत्येक वाहिनीवरील वसुली करणे आणि वीजगळती रोखण्याची जबाबदारी असणार आहे.

रोहित्रनिहाय सर्वेक्षण - आराखड्यानुसार परिमंडळात रोहित्रनिहाय सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार प्रत्येक रोहित्राची वसुली वाढवण्यासह गळती कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोबतच लवकर वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. वीजचोरीला आळा घालण्यासाठी चोरांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

आराखड्याचे उद्देश - थकबाकी वसुली, वीजचोर्‍यांना आळा घालणे, जुन्या उपकरणांची दुरुस्ती-देखभाल इत्यादी कामांना प्राधान्य देत वीजवाहिन्यांवरील वसुलीचे प्रमाण वाढवून वीजगळतीचे प्रमाण कमी करणे व त्यांना इ, फ, ग या गटांतून भारनियमनमुक्त असलेल्या अ, ब, क, ड गटात आणणे.