आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - मनसेने आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्यास जर्मनीतील विलो कंपनीच्या माथेर प्लांटच्या भारतीय व्यवस्थापकांनी भेट देत दीडशे हायड्रो इंजिनिअर्सनी मागणी केली. तर, सोमवारी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील 970 रिक्त जागांसाठी 1400 उमेदावारांनी मुलखती दिल्याने मेळाव्याच्या दुसर्या दिवशीही बेरोजगारांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले.
विलो ही कंपनी पाइप आणि व्हॉल्व्हची असल्याने याच क्षेत्रातील डिग्री किंवा डिप्लोमा झालेल्या उमेदवारांची आवश्यकता असल्याची अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली. कंपनीचे जगभर प्लांन्ट असून, भारतात तीन प्लांन्ट आहेत. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना जगभर त्यांच्या क्षमतेनुसार पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी मेळावा आयोजकांना सांगितले. शिष्टमंडळाशी सभागृहनेते शशिकांत जाधव यांनी समन्वय साधत इंजिनिअर्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. मेळाव्यास शिक्षण मंडळ सदस्य जय कोतवाल, न
या कंपन्यांनी घेतल्या मुलाखती
ग्लोबल बीपीओ, व्हर्गो बीपीओ, ब्ल्यू बर्ड, डब्ल्यूएनएस, एस. बी. एंटरप्रायझेस, इंडस आयएनडी बँक, नाशिक सर्व्हिस डॉट कॉम, इल्युमिनस टेक्नॉलॉजी, मेट लाईफ, डिश टीव्ही या माहिती आणि तंत्रज्ञान व सेवा कंपन्यांनी 970 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात पाच कंपन्यांनी निवड केलेल्या उमेदवारांचा त्यांच्या मनुष्यबळ विकास (एच.आर.) विभागाने पुन्हा मुलाखती घेत पगाराबाबत वाटाघाटी केल्या.
औद्योगिक क्षेत्रातील उमेदवारांच्या आज मुलाखती होणार
मंगळवारी औद्योगिक क्षेत्रातील उमेदवारांच्या मुलाखती होणार आहे. तसेच लिपिक व संगणकचालक यांसारख्या जागांसाठी मुलाखती होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.