आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्टाेन्मेंट निवडणुकीत ७२ उमेदवार रिंगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकराेड - देवळाली कॅन्टाेन्मेंट बाेर्डाच्या निवडणुकीत अाठ वाॅर्डांत दाखल ११७ उमेदवारांपैकी गुरुवारी (दि. ११) ४५ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ७२

उमेदवार राहिले. राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेना विरुद्ध भाजप-रिपाइं युतीला अपक्षांशी लढत द्यावी लागणार अाहे.

११७ अर्ज दाखल हाेते. दाेन माजी नगरसेवकांसह शिवसेना, मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माघारीमुळे पक्षीय उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. निवडणुकीत सर्व

वाॅर्डांत शिवसेनेचे धनुष्य, भाजप सात ठिकाणी कमळ या निशाणीवर, तररिपाइं एका जागेवर टेलिफाेन निशाणीवर निवडणूक लढवणार अाहे. अाठ वाॅर्डांत ७२ पैकी २२

महिला उमेदवार अापले नशीब अाजमावत अाहेत. वाॅर्ड चारमध्ये महिला उमेदवारांत दुरंगी लढत अाहे, तर वाॅर्ड सहामध्ये दीर-भावजयीमध्ये लढत हाेत अाहे. भाजपचे

तालुकाध्यक्ष रतन चावला यांना वाॅर्ड तीनमधून बंडखाेरी करून पक्षाला अाव्हान दिले अाहे. वाॅर्ड मध्ये लष्करी जवानांची सुमारे दाेन हजार मते अाहेत. केंद्रात भाजपची सत्ता

असल्याने त्याचा फायदा हाेईल, या हेतूने येथून मनसेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन ठाकरे ‘कमळ’ ह्या भाजपच्या निशाणीवर निवडणूक लढवत अाहेत.

वाॅर्डनिहाय उमेदवार (कंसात एकूण उमेदवार) : वाॅर्ड- (१२) अाशा दास, दीक्षा माेरे, अाशा माेहिते, रेखा चांदणे, उषा अाडके, शाेभा पवार, अंजू थामेत, प्रभावती धिवरे,

शीतल थामेत, चंद्रप्रभा केदारे, रेखा भालेकर संगीता पवार. वाॅर्ड २- (४) सचिन ठाकरे, संजय गाेडसे, गुंडाप्पा देवकर, रवींद्र चावरिया. वाॅर्ड ३- (१०) सुरेश कदम, रतन

चावला, अतुल हाबडे, प्रकाश गुप्ता, रफिक सिद्दिकी, लियाकत काझी, हृषीकेश धनगर, भगवान कटारिया, फारुख खान, नितीन गायकवाड. वाॅर्ड ४- (२) अाशा गाेडसे,

सारिका धुर्जड. वाॅर्ड ५- (१४) दिनकर अाढाव, भीमराव डांगळे, विलास पवार, विकास अहिरे, पाैर्णिमा गायकवाड, दीपक उन्हवणे, अजय भालेराव, विलास बाेराडे,

बाळकृष्ण अाढाव, संजय जाधव, जगदीश पवार, मनाेज रूपवते, निखिल माेरे, विनाेद भगवाने. वाॅर्ड ६- (१२) बबन माेरे, चंद्रकांत कासार, जेम्स बर्नाड, जेकब पिल्ले,

मंगल फुले, नंदू पवार, महाराज बुंदेल, कावेरी कासार, नीलेश कांबळे, राधेश्याम यादव, श्याम पवार अनंता पवार. वाॅर्ड ७- (१२) बाबूराव माेजाड, पुंडलीक जाधव, राजू चा

ैधरी, प्रवीण पाळदे, लालू पवार, सुरेश कुसाळकर, अरविंद डांगे, अनिल निसाळ, भास्कर चाैधरी, दिलीप गवळी, देवीदास अंबिलकर रवींद्र गायकवाड. वाॅर्ड ८- (६) मीना

करंजकर, यमुना चाैधरी, सुरेखा करंजकर, नीलिमा कुलथे, कांचन मेढे उषा भाेर.