आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इएसआय रुग्णालयाचा कारभार सुधारा, 10 सप्टेंबरपर्यंत मुदत; तीव्र आंदोलनाचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - इएसआय रुग्णालय प्रशासनाच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ शनिवारी सीटूचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी रुग्णालय प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने केली. 10 सप्टेंबरपर्यंत रुग्णालयाच्या कारभारात सकारात्मक बदल न झाल्यास वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण चव्हाण यांची खुर्ची खाली करू तसेच मुंबईत बसलेल्या आयुक्तांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा डॉ. कराड यांनी दिला.

औद्योगिक वसाहतीतील दीड लाख कामगारांच्या वेतनातून दरमहा पाच कोटी रुपये इएसआयला मिळतात, असे असतानाही या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. साध्या शस्त्रक्रियेसाठी कामगार रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. या पार्श्वभूमीवर सीटूच्या वतीने निदर्शने करण्यात आली. सीटूचे प्रदेश सरचिटणीस डॉ. कराड यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण चव्हाण यांना धारेवर धरत कामगारांना येणार्‍या अडचणींची जाणीव करून दिली.