आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमधील शेतकऱ्यांना 2018 पर्यंत सौरऊर्जा, 24 तास मिळणार वीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - वीजउत्पादन आणि वितरणात मोठी आर्थिक तफावत पडत असल्याने खर्चात कपातीसाठी राज्य शासनाने २०१८ पर्यंत नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सौरऊर्जा देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे वीजकपात होऊन ग्रामीण भागात २४ तास वीज उपलब्ध होणार असल्याने राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी नाशिक दौऱ्याच्या वेळी सांगितले. 
 
राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात त्यांच्या सोयीनुसार वीजपुरवठा व्हावा म्हणून एक ते दोन मेगावॅट वीजनिर्मिती करणारे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जमीन उपलब्ध करून दिल्यास ही जमीन पंचवीस वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेऊन लागणारी वीज सौरऊर्जा प्रकल्पामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या वाहिनीची देखभाल, दुरुस्ती महावितरण कंपनी करणारअसल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. 

प्रत्येक गावात वीजपुरवठा नियमित मिळण्यासाठी तसेच विजेसंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील ७७६ ग्रामपंचायतींमध्ये आयटीआय (इलेक्ट्रॉनिक) उत्तीर्ण तरुणांस ग्रामविद्युत रक्षक म्हणून नियुक्त करण्यासाठी त्वरित कार्यवाहीचे आदेश यावेळी संबंधित शाखा अभियंत्यांना दिले. येवला तालुक्यात मागील काही वर्षांपूर्वी ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेतील सहा हजार ७०० शेतकरी वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास तत्काळ पाठवून संबंधित शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्यासाठी प्राधान्याने विचार करण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. 
 
दाेन कोटी ३१ लाख 
नाशिक जिल्ह्यात बागायती क्षेत्र मोठे असल्याने अनेक नागरिक शेत-शिवारामध्ये वास्तव्यास असतात. त्यांच्या घरात कायम प्रकाश उपलब्ध राहण्यासाठी विशेष रोहित्र (एसडीटी) तसेच सिंगल फेज वीज व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याला दोन कोटी ३१ लाख उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...