आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक फेस्टिव्हलची आज ‘ग्रँड’ सांगता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भुजबळ फाउंडेशन आयोजित नाशिक फेस्टिव्हलचा ग्रॅँड फिनाले रविवारी संध्याकाळी 6 वाजता अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. मकर संक्रांतीची संध्याकाळ नाशिककरांना सेलिब्रिटींच्या सहवासात अनुभवायला मिळणार आहे. प्रसिद्ध गायक शान, अभिनेते अनिल कपूर, गोविंदा, समिरा रेड्डी आदी नामवंत मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशकात अवतरणार आहे.
शान यांच्या गाण्यांचा आस्वाद यावेळी नाशिककरांना घेता येणार आहे. कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. व्यासपीठाच्या उभारणीसाठी खास कारगिरांना पाचारण करण्यात आले होते. प्रसिद्ध टीव्ही शो ‘बिग बॉस’च्या सेट डिझायनर्सनी हे व्यासपीठ अत्यंत कलात्मकरीत्या उभारले असून, कलाकारांच्या कलाकारीबरोबरच या व्यासपीठाची रचनादेखील पाहण्यासारखी आहे. सुमारे शंभर कारागिरांनी या व्यासपीठासाठी मेहनत घेतली आहे. तब्बल दीडशे फुटांच्या या व्यासपीठाच्या भव्यतेमुळे कलावंतांचे सादरीकरणाला रंगत येणार आहे. यावेळी चित्रकला, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभदेखील ग्रॅँड फिनालेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे.