आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्‍ये झळाळल्या तारका.. उलगडल्या नायिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक -‘निंबलोण उतरू कशी, माझा रंग गोरापान’ यासारखी सुलोचनादीदींच्या सात्त्विक व तितक्याच आव्हानात्मक भूमिका असलेली गाणी असो वा अगदी अलीकडील ‘टिकटिक वाजते डोक्यात.’ यासारखी गाणी सादर करत विविध काळातल्या मराठी चित्रपटांमधील नायिकांचा गाण्यांच्या रूपाने प्रवास उलगडत गेला आणि गंगाघाटावर जमलेल्या नाशिककरांना मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध करणार्‍या नायिकांची रूपे अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते भुजबळ फाउंडेशनच्या ‘नाशिक फेस्टिव्हल’चे.

या वेळी आर्या आंबेकर, प्राजक्ता रानडे, हृषीकेश रानडे, धवल चांदवडकर, सायली जोशी आदी कलाकारांनी हा प्रवास गाण्यांमध्ये रचत रसिकांना डोलायला लावले. सायली जोशी यांनी जयर्शी गडकर यांच्यावर चित्रित ‘ऐरणीच्या देवा तुला’ हे गीत सादर केले. ऊर्मिला धनगर यांनी सादर केलेल्या ‘पदरावरती जरतारीचा’ आणि ‘बुगडी माझी सांडली गं’ या लावण्यांनी तर कहरच केला. जयर्शी गडकरांपासून उषा चव्हाण ते अगदी आताच्या सोनाली कुलकर्णी, क्रांती रेडकर, मुक्ता बर्वे आदी तारकांपर्यंतचा या गायकांनी उलगडवलेल्या गीतप्रवासाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सूत्रसंचालन ‘राधा ही बावरी फेम’ सौरभ गोखले यांनी केले.