आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या सेवेत अत्याधुनिक व्हॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या सेवेत ब्रिथिंग अप्रॅट्स अर्थात, बीए ही अत्याधुनिक व्हॅन दाखल झाली आहे. या बहुपयोगी व्हॅनमुळे कर्मचाऱ्यांना घटनास्थळीच ऑक्सिजनचे सिलिंडर भरण्याची सोय उपलब्ध झाली असून, काही मिनिटांचीच मर्यादा असलेल्या सिलिंडरमुळे दुसऱ्या सिलिंडरवर अथवा दुसऱ्या वाहनावर अवलंबून राहावे लागणाऱ्या कर्मचा-यांना तातडीने ऑक्सिजनचे सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. आग अथवा वायू गळती आदी आपत्तींप्रसंगी ही व्हॅन उपयुक्त ठरणार असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन यांनी दिली.

पुढील स्‍लाईडमध्‍ये जाणून घ्‍या, संबंधित फोटो व माहिती..