आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धरणात 78 टक्के पाणीसाठा; ‘दारणा’तून 5012 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणात दोन दिवसांत सात टक्क्यांनी पाणीसाठा वाढला. तर, दारणा धरणातून 5 हजार 12 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

सध्या नाशिक शहरासह मराठवाड्याची तहान भागविणार्‍या गंगापूर धरणात 28 जुलै रोजी 4 हजार 377 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. गत वर्षापेक्षा दुप्पट पाणीसाठा असल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे. मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणात कमी प्रमाणात पाणी साठले होते. औद्योगिक, शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी राखीव असल्याने टंचाई मोठय़ा प्रमाणात जाणवली होती. जिल्ह्याची तहान भागविल्यानंतर मराठवाड्यातील काही गावांची तहान भागविण्यात येते. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना थेट गंगापूर धरणावर जाऊन आंदोलन करावे लागले होते. मात्र, यावर्षी पुढील पावसाच्या मुख्य हंगामातील उर्वरित दिवसांत संततधार सुरू राहिली तर पाण्यासाठी दबाव राहणार नाही. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडत आहे.