आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचे गावठाण आता हाेणार स्मार्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चिंचाेळ्या गल्ल्या, उंच-सखल भागामुळे अाेबडधाेबड झालेला विस्तार, रस्ते-वीज-पाणी अशा अनेक समस्यांची नगरीच बसलेल्या नाशिकमधील जुने नाशिक पंचवटी या गाेदातीरावर गावठाणाचे रुपडे पालटण्यासाठी महापालिकेने चाचपणी सुरू केली अाहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी याेजनेंतर्गत रेट्राेफिटिंगसाठी दाेन्ही भागांतील गावठाणाची निवड करण्यात अाली असून, वाय-फाय, स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल अशा अनेक याेजनांचा पाऊसच पडणार अाहे.
केंद्र शासनाने स्मार्ट सिटी याेजनेंतर्गत माेठ्या शहरांचा विकास करण्याचे नियाेजन केले अाहे. स्मार्ट सिटीत रेट्राेफिटिंगमध्ये शहरातील जुन्या भागाच्या नियाेजनबद्ध विकासाचीही अट अाहे. त्यानुसार, पंचवटी जुने नाशिक या गावठाणाचा विचार महापालिकेने सुरू केला अाहे. प्रामुख्याने गावठाणात मूलभूत सुविधांबराेबरच महत्त्वाच्या याेजना कशा अमलात अाणता येतील, याची चाचपणी केली जाणार अाहे. दाेन्ही गावठाण क्षेत्रांची निवड करण्यापूर्वी महासभेत प्रस्ताव पाठविला जाणार असून, नगरसेवकांच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णय हाेणार अाहे.

दरम्यान, या निर्णयामुळे जुने नाशिक आणि पंचवटी परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून लालफितीत अडकलेली कामे निकाली निघण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे यासंदर्भात नेमका कधी आणि कोणता निर्णय होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

डिसेंबरची मुदत
स्मार्टसिटीसाठी केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविण्याकरिता डिसेंबरपर्यंतची मुदत असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. हातात जेमतेम दहाच दिवस उरल्यामुळे अाता महापालिकेने प्रस्ताव अंतिम करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या अाहेत. पर्यटकांकरिता सहज पर्यटनासाठी काय करता येईल, ऊर्जाबचतीसाठी काय करता येईल आदींचा अंतर्भाव त्यात राहणार आहे.

सूचना मागविणार
नागरिकांकडून महत्त्वाच्या सूचनांसाठी प्रश्नावली करण्यात अाली असून, जुने नाशिकमधील वाहतूक समस्येसाठी काय उपाय असतील, रस्त्यावरील वाहतूक सुरू राहील पादचाऱ्यांची अडचण हाेणार नाही, त्याचबराेबर फेरीवाले कायम राहतील, यासाठी काय करता येईल, सुविधांसाठी अधिक कर देण्याची तयारी अाहे का, अशा प्रश्नांची उत्तरे मागितली अाहेत.

{ पाणीपुरवठा, भुयारी गटार, ड्रेनेज लाइन सेवा पातळी उंचावणे.
{ परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे.
{ लॅण्ड स्केपिंग, रस्ते सुशाेभीकरण
{ रस्ते रुंदीकरण सुधारणा करणे. फेरीवाला क्षेत्र
{ रस्त्यांवरील विद्युत वाहिन्या भूमिगत करणे.
{ नवीन इमारतींवर साैरऊर्जा यंत्रणा बसविणे.
{ एकेरी, दुहेरी रस्ते, वाहनतळांचे स्मार्ट नियाेजन करणे.
{ डिजिटल, अाॅडिअाे टुरिस्ट गाइड
{ उच्च दर्जाचे पाणीमीटर बसविणे. ऊर्जा बचत करणारे दिवे वापरणे.
{ पर्यटनस्थळांना वाय-फाय, नोंदणीकृत हाेम-स्टे विकसन