आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमात अडसर ठरणा-या आईचा खून; मुलीसह प्रियकर सुधारगृहात

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रेमप्रकरणात अडसर ठरणार्‍या आईचा प्रियकराच्या मदतीने खून करणारी मुलगी व प्रियकर हे दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तेथील न्यायालयाने या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
टाकळी रोडवरील नीलम हाइट्स येथे राहणार्‍या गुरुविंदरकौर मनप्रीतसिंग बिरदी यांचा खून करून त्यांचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. चौकशीअंती गुरुविंदरकौर यांची मुलगी गुरुसिमरन कौर व तिचा मित्र मोईन अस्लम शेख यांनीच त्यांचा खून केल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी गुरुवारी त्यांना ताब्यात घेले होते. मात्र दोघेही बालगुन्हेगार असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी चौकशीसाठी या दोघांचा ताबा मिळावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने त्यास नकार देत 14 दिवस दोघांनाही सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांना चौकशी करायची असल्यास बालसुधारागृहात येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अन्य काहींचा सहभाग असल्याचा संशय
दरम्यान, या गुन्ह्यात दोघांसोबत आणखी काही गुन्हेगार असण्याचा संशय गुरुविंदरकौर बिरदी यांच्या नातलगांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. या संदर्भात निरीक्षक दायमा यांनी नातलगांच्या तक्रारीनुसार त्या दिशेनेही तपास करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
नाशकात प्रेमात अडसर ठरणार्‍या आईचा मुलीकडून खून