आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik Girl Play Drama In Bratjha International Youth Festival

दिव्य मराठी विशेष : नाशिकच्या कृत्तिकाची ‘ओ फ्रिदा’सह परदेशवारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बल्गेरियातील ब्रात्झामध्ये दर दोन वर्षांनी होणाऱ्या इंटरनॅशनल यूथ फेस्टिव्हलमध्ये प्रथमच भारताला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. एक्स्प्रेशन लॅब, पुणे निर्मित ‘ओ फ्रिदा’ हे पहिले एकपात्री मराठी नाटक या वर्षी १२ ते १७ जूनदरम्यान होणाऱ्या या १६ व्या फेस्टिव्हलसाठी निवडले गेले आहे. हा एकपात्री दीर्घांक असून, त्यामधील ‘फ्रिदा’ हे पात्र नाशिकची कलाकार कृत्तिका देव साकारणार आहे.
‘फ्रिदा काहलो’ या मेक्सिकन कलाकाराच्या जीवनावरील हा दीर्घांक आहे. पुण्याचे अभिषेक देशमुख यांनी त्याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. वेशभूषा मिताली पांढरे, रंगभूषा आशिष देशपांडे, प्रकाशयोजना मिहिर कुलकर्णी, हेमंत चातुर्य, संगीत आकाश चौधरी आणि नेपथ्य अमेय भालेराव, प्रसाद राजोपाध्ये, हर्ष सिंग यांचे आहे. त्याचे बल्गेरियातील सादरीकरण हा भारतीय नाट्यक्षेत्राच्या वाटचालीतील मानाचा तुरा ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या नाटकाचा विषय आणि आशय त्याची प्रत उंचावणारा ठरतो.
प्रायोगिकनाटक, परदेशात जाण्यासाठी हवी मदत :हे भारतातून जाणारे पहिलेच एकपात्री नाटक असले तरी या महोत्सवासाठी जाण्याचा खर्च स्वत: करायचा आहे. त्यास अनुदान मिळणार नाही किंवा संस्था मदत करणार नाही. या एकाच कारणाने त्यांची परदेशवारी हुकण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी जाण्याचा खर्च ५५ हजारांच्या अासपास जातो. त्यामुळे नाटकाची टीम सध्या मदतीच्या अपेक्षेत आहे. यांना मदत करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिकच्या कृत्तिकाने साकारलेल्या ‘ओ फ्रिदा’ची

हेमंतचातुर्य, संगीत आकाश चौधरी आणि नेपथ्य अमेय भालेराव, प्रसाद राजोपाध्ये, हर्ष सिंग यांचे आहे. त्याचे बल्गेरियातील सादरीकरण हा भारतीय नाट्यक्षेत्राच्या वाटचालीतील मानाचा तुरा ठरणार आहे. मुळात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या नाटकाचा विषय आणि आशय त्याची प्रत उंचावणारा ठरतो.
प्रायोगिक नाटक, परदेशात जाण्यासाठी हवी मदत

हे भारतातून जाणारे पहिलेच एकपात्री नाटक असले तरी या महोत्सवासाठी जाण्याचा खर्च स्वत: करायचा आहे. त्यास अनुदान मिळणार नाही किंवा संस्था मदत करणार नाही. या एकाच कारणाने त्यांची परदेशवारी हुकण्याची शक्यता आहे. प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी जाण्याचा खर्च ५५ हजारांच्या अासपास जातो. त्यामुळे नाटकाची टीम सध्या मदतीच्या अपेक्षेत आहे. यांना मदत करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शोधण्यापासून होती सुरुवात

फ्रिदाबद्दल भारतात, अगदी इंग्रजी संदर्भग्रंथांतही तुटपुंजी माहिती होती. शेवटी तिची स्पॅनिश भाषेतील डायरी सापडली. तिचे खासगी आयुष्यही गुंतागुंतीचे होते. हे सगळं एका सूत्रात बांधण्यास साडेतीन महिने लागले. -अभिषेक देशमुख, लेखक आणि दिग्दर्शक
फ्रिदा साकारताना चित्र शिकले

‘ओफ्रिदा’ ही व्यक्तिरेखा भारतीय नसल्याने तिचे हावभाव, वावर शिकण्यास वेळ लागला. स्वत:चे चित्र काढण्यासाठी ही कला शिकले. वय १० ते ५१ पर्यंतची फ्रिदा साकारण्याचे आव्हान मोठे होते. -कृत्तिका देव, अभिनेत्री
‘फ्रिदा काहलो’बद्दल...

‘फ्रिदाकाहलो’ ही मेक्सिकन व्यक्तिरेखा जगाच्या पाठीवर अत्यंत मोजक्या माध्यमांतून प्रकटली. स्वत:ची चित्रे काढणारी ती चित्रकार होती. तिने आपले विश्व चित्रांच्या माध्यमातून जगाच्या समोर आणले. आपल्या भावना तिने कुंचल्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यास सुरुवात केली.
जीवनातील शेवटची दहा वर्षे तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. तिचा जीवनपट या नाटकाच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे. १९८७ पासून दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध विषयांवरील प्रायोगिक प्रामुख्याने युवा कलाकार असलेल्या नाटकांचा समावेश होतो. वय वर्षे १४ ते ३९ च्या कलाकारांना यामध्ये भाग घेता येऊ शकतो.