आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणालीची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रशिक्षणार्थी सहकार्‍यांकडून होणार्‍या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रणाली प्रदीप रहाणे (19) हिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.

सुचेतानगरमध्ये राहणार्‍या या युवतीने बॉश कंपनीतील छळ असह्य झाल्यामुळे जीवनयात्रा संपवित असल्याची चिठ्ठी लिहून ठेवत रविवारी हाताच्या नसा कापून घेतल्या, लगेचच गळफासही घेतला होता. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी 7.15 वाजता तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी चिठ्ठीत नावे असलेल्या चार तरुणींसह दहा जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळे आणि प्रशिक्षणात सातत्याने अव्वल आल्यामुळेच प्रणालीला तिचे सहकारी त्रास देत होते. आजारी असतानाही दोन दिवसांच्या विर्शांतीनंतर ती कंपनीत गेली. तेव्हाही ‘ही जिवंत कशी आली’ असे अपशब्द वापरण्यात आले. त्यामुळेच तिचे मनोधैर्य खचल्याचा आरोप प्रणालीच्या वडिलांनी केला, तर मामांनी कंपनीमध्ये तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप केला. याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापनाने अधिकृतपणे बाजू स्पष्ट केली नसली तरी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.