आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचे आता मिशन ‘सुरक्षित गोदाघाट’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - गोदाघाटाची स्वच्छता करण्यास महापालिका कमी पडत असली तरी पर्यटकांचे व भाविकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांच्या सुरक्षिततेसाठी पंचवटी पोलिसांनी मिशन ‘सुरक्षित गोदाघाट’ हाती घेतले आहे. या अभियानअंतर्गत गोदाघाट परिसरातील विविध भागांमध्ये येणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी खास उपाययोजना करण्यात येणार आहेत.
अशी असेल मोहीम
> पहाटे 4 ते 7 वाजेपर्यंत एक अधिकारी चार कर्मचार्‍यांची गस्त. दोन शिफ्टमध्ये हे काम चालणार.
> विविध परिसरामध्ये साध्या वेशात पोलिस कर्मचारी तैनात करणार.
> येणार्‍या भाविकांवर तसेच संशयितांवर नजर ठेवली जाणार.
> धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेवर विशेष भर दिला जाणार.
भाविकांच्या तक्रारी
> पर्यटनासाठी व रामकुंडावर येणार्‍या भाविकांच्या वस्तू मोठय़ा प्रमाणावर चोरीला जातात.
> रिक्षाचालक मनमानी करून प्रवाशांची लुबाडणूक करतात.
> भाविकांची फसवणूक केली जात असल्याच्या भरपूर तक्रारी.
> परिसरातील चोरट्यांकडून होते मोठय़ा प्रमाणावर लूट.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोहीम - मागील काही दिवसांमध्ये भाविकांच्या तक्रारी वाढल्याने ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून ही मोहीम महत्त्वाची आहे. शांतता समिती व पुरोहित संघानेही सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली होती. बाजीराव भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक