आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदा प्रदूषणाविरोधात राष्ट्रीय लढा; गोदावरी महापंचायतीचे आयोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गोदावरीचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनाही तोकड्या पडत असल्याने आता हा विषय राष्ट्रीय पातळीवर लढण्याची तयारी गोदावरी गटारीकरणविरोधी मंचने जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या सहकार्याने सुरू केली आहे. जयपूरजवळील बिकमपुरा येथे झालेल्या पाचव्या राष्ट्रीय जलसंमेलनात या विषयावर गांभीर्याने चर्चा झाली. शहरात लवकरच गोदावरी महापंचायतीचेही आयोजन करण्यात आले आहे.

गोदावरीच्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात उच्च न्यायालयात लढा देणारे राजेश पंडित, निशिकांत पगारे, नितीन रुईकर, प्रकाश वाजपेयी यांना डॉ. सिंह यांनी या राष्ट्रीय संमेलनासाठी आमंत्रित केले होते. संमेलनात गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, कोसी, मंदाकिनी यांसह विविध नद्यांवरील आंदोलने, न्यायालयीन लढय़ांविषयी या वेळी चर्चा करण्यात आली. नदी आणि सांडपाण्याचे मार्ग वेगवेगळेच असावेत, असा एकमुखी ठराव यावेळी करण्यात आला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीचा प्रश्न सोडविण्यासाठी देशभरातील सर्व आंदोलकांनी एकत्र येऊन गोदावरी गटारीकरणविरोधी मंचला पाठिंबा देण्याचा ठरावदेखील या वेळी मंजूर करण्यात आल्याचे पंडित यांनी सांगितले.