आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरीत मिसळणारे सांडपाणी थेट तपोवनात प्रक्रियेसाठी..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गोदावरी नदीच्या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाकडून महापालिका प्रशासनाला विचारणा होत असल्याने त्यादृष्टीने महापालिकेने उपाययोजना सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोदावरीत मिसळणारे सांडपाणी बंद करण्यासाठी चोपडा लॉन्स येथे स्टोअरेज कलेक्शन व पंपिंग स्टेशन उभारून तेथून सांडपाणी उचलून थेट तपोवनातील मलजलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून गोदावरी नदीत सोडले जाणार आहे.
गोदा प्रदूषणाविषयी गोदावरी गटारीकरणविरोधी मंचाने दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने पालिका प्रशासनाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ‘निरी’ या संस्थेला उपाययोजना करण्याच्यादृष्टीने अहवाल सादर करावयास सांगितला होता. ‘निरी’ने तसा अहवाल सादर केला आहे. पालिकेकडून चोपडा लॉन्स येथील पुलाजवळ असलेले सांडपाणी स्टोअरेज कलेक्शन चेंबर आणि पंपिंग स्टेशन कार्यान्वित केले जाणार आहे. सकाळी व सायंकाळी या ठिकाणी असलेल्या पाइपलाइनमधून नदीमध्ये सांडपाणी मिसळत असते. त्याचे प्रमाण सुमारे सहा दशलक्ष लिटर असल्याचे पालिकेने केलेल्या पाहणीत आढळले.
चोपडा लॉन्स येथे साकारणार्‍या पंपिंग स्टेशनमधून प्रतिदिन 25 दशलक्ष लिटर पाणी उचलून ते मखमलाबादरोडमार्गे थेट तपोवनातील मलजलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रियेसाठी नेण्यात येणार आहे. यासंदर्भात पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, त्यातील पहिल्या टप्प्याच्या कामाचा कार्यारंभ आदेशदेखील निघाला आहे.
अशी असेल पाइपलाइन : चोपडा लॉन्स पुलाजवळील पंपिंग स्टेशन येथून सांडपाणी उचलून ते मखमलाबादरोडने तपोवनात जाणार्‍या पाइपलाइनद्वारे मलजलशुद्धीकरण केंद्रात नेले जाईल. त्यासाठी एक वर्षाचा कालावधी दिला जाणार आहे. प्रकल्पाची किंमत 15 कोटी रुपये आहे.
क्षमता वाढणार
नव्याने होणार्‍या पंपिंग स्टेशनमुळे 25 दशलक्ष लिटर सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे. यामुळे गोदावरीत मिसळणारे सांडपाणी वर्षभरात बंद होईल. संजय खंदारे, आयुक्त, महापालिका