आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामकुंडावर निर्माल्यासाठी स्वतंत्र पात्र, प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेची उपाययोजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गोदावरीत होणारे विविध प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, पुरोहित संघासह सामाजिक संस्थांनी सुचवल्यानुसार रामकुंडाजवळ निर्माल्य व इतर साहित्याच्या संकलनासाठी मोठे स्टीलचे भांडे ठेवण्यात आले आहे.
गोदावरी प्रदूषणासंदर्भातील उपाययोजनेविषयी चर्चेसाठी ‘दिव्य मराठी’ने पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविदानंद सरस्वती, महंत कृष्णचरणदास महाराज यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांना आमंत्रित केले होते. त्यात पुरोहित संघाने प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाय सुचवले होते. रामकुंडात होणारे अस्थिविसर्जन, पिंडदान, तसेच इतर निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेऊन भाविकांचे मन वळवण्याबरोबरच महापालिकेकडे पाठपुरावा करण्याचे ठोस आश्वासन संघाने दिले होते. त्यानंतर आता महापालिकेने रामकुंडाजवळ सात फूट बाय चार फूट आकाराच्या पात्राची व्यवस्था केली असून, त्यात निर्माल्य व इतर साहित्य संकलित केले जात आहे. पालिकेने साफसफाईसाठी कायमस्वरूपी कर्मचार्‍यांची व्यवस्थाही केली आहे.
आसारामबापू आश्रम, चोपडा लॉन्स, अहिल्यादेवी होळकर व संत गाडगे महाराज या पुलांच्या दोन्ही बाजूंना उंच जाळ्या बसवण्याची तयारीही सुरू आहे.