आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमधील गोदेला येणार पूर्वीचे रुपडे!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कुंभमेळ्यात येणार्‍या भाविकांची संख्या पाहता सध्याचा गंगाघाट त्यासाठी कमी पडण्याची आणि त्यातून वादविवाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन गंगाघाटाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. मुख्य सचिवांनी त्याबाबत सूचनाही केल्या आहेत.

मागील कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांची आणि साधु-महंतांची गर्दी झाली होती. त्यावेळी वादही झाले होते. यंदा ती परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. रामकुंडापासून ते अमरधाम पुलापर्यंत घाटाची डागडुजी, विस्तारीकरण तसेच पायर्‍यांचेही विस्तारीकरण करण्यात येणार आहे. साचलेला गाळ काढणे, आजूबाजूचा घाण-कचरा स्वच्छ केला जाणार आहे. यामुळे स्नानासाठी रामकुंडावर होणार्‍या गर्दीचे विभाजन होईल, गंगाघाटावर कुठेही स्नान करता येईल, असे नियोजन आहे.