आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: हल्ल्यातील गंभीर जखमी गॉगल विक्रेत्याचा मृत्यू, पाच संशयितांवर खुनाचा गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: टोळक्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गॉगल्स विक्रेत्याचा उपचारादरम्यान मंगळवारी (दि. १२) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी पाच संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. ११) दुपारी वाजेच्या सुमारास वेदमंदिर येथे गॉगल खरेदी करण्याच्या वादातून टाेळक्याने या विक्रेत्याला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
 
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एतेशाम इरशाद अन्सारी (वय २५, रा. मेहबूबनगर, वडाळारोड) हा त्र्यंबकरोडवर वेदमंदिरासमोर गॉगलविक्रीचा व्यवसाय करत होता. रविवारी दुपारी वाजता चार ते पाच संशयित दुचाकीहून आले. गॉगल खरेदी करत असताना दीडशे रुपयांचा गॉगल ७० रुपयांना मागितला. एतेशाम याने गॉगल विक्री करण्यास नकार दिल्याने संशयितांनी त्यास बेदम मारहाण केली. वर्मी मार लागल्याने तो बेशुद्ध पडला. काही नागरिकांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. याप्रकरणी दानिश अन्सारी यांच्या तक्रारीनुसार जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी(दि. १२) सकाळी उपचार सुरू असताना एतेशामचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या तपासात पाच संशयितांची नावे निष्पन्न झाली.
 
चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित मल्हारखाण येथील असून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक रमेश पवार तपास करत आहे. एतेशाम मूळ उत्तर प्रदेशातील आहे.
 
कामानिमित्त तो शहरात आला होता. त्याच्या पश्चात पत्नी सहा महिन्यांची मुलगी आहे. मृत्यू झाल्याचे समजताच नागजी परिसरात आणि जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
 
सत्तर रुपये पडले महागात : दीडशे रुपयांचा गॉगल संशयितांनी सत्तर रुपयांना मागितला. यास एतेशामने नकार दिल्याने वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. एतेशाम याचा रोजा असल्याने ताे उपाशीपोटी होता. लाथा-बुक्क्यांनी पोटात, मणक्यावर मार लागल्याने ताे बेशुद्ध पडला.
 
गॉगल खरेदीचा वाद 
गॉगल खरेदीच्या वादातून हा प्रकार घडला. पाच संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. एक फरार आहे. पथकाकडून शोध सुरू आहे. -लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त 
बातम्या आणखी आहेत...