आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासकीय कन्या शाळेने टाकली कात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शासकीय कन्या शाळेत आता पहिली ते चौथीचे धडेही विद्यार्थ्यांना गिरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 86 वर्षे जुनी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या शाळेत आधुनिक सुविधा व त्यासोबत गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जोड दिली जात असल्यामुळे कन्या शाळा कात टाकत असल्याचे सुखद चित्र दिसत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकार्‍यांनी एकत्र पुढाकार घेतला आहे.

शासकीय कन्या शाळेसंदर्भात जिल्हा परिषदेकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती जि. प. अध्यक्ष जयर्शी पवार व सीईओ रणजितकुमार यांनी पत्रकारांना दिली. या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण सुरू होते. मात्र, जिल्हा परिषदेने आता पहिली ते चौथीपर्यंत सेमी इंग्रजी तसेच मराठी माध्यमाचे वर्ग सुरू केले. कन्या शाळेच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पालकमंत्र्यांनी निधी दिला. शाळा नूतनीकरणाबरोबरच गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनासाठी नाशिक एज्युकेशन सोसायटीकडून तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे शिक्षक आठवड्यातून नेमून दिल्याप्रमाणे मार्गदर्शन करतील. लायन्स क्लब ऑफ इंडिया पंचवटी यांच्या सहकार्याने सन 2013-14 या शैक्षणिक वर्षात गरजू विद्यार्थिनींसाठी वसतिगृहही उभारले जाणार आहे. तसेच विद्यार्थिनींच्या प्रवासाबाबतही सहकार्य केले जाणार आहे.

कन्या शाळेचा इतिहास

> इमारत निर्मिती : सन 1861 मध्ये (ब्रिटिश कार्यालयासाठी वापर)

> मुलांची शाळा : सन 1917 मध्ये

> शासकीय कन्या शाळा : सन 1940 मध्ये.

कोण शिकले येथून
स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर, कै. दादासाहेब फाळके यांच्या कन्या मंदा, शिरीष पै, मालती पांडे, मंदा आकुत, तिलोत्तमा टकले, लता ओक, सुधा वैशंपायन, निशा मोने, विमल नाडकर्णी, शुभांगी पंडित.