आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक पदवीधरमध्ये अाघाडीचे डॉ. सुधीर तांबे यांची विजयासह हॅटट्रिक, 42 हजार 825 मतांनी विजयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वैयक्तिक जनसंपर्क, सलग दोनदा आमदारकी आणि सहा महिन्यांपासून निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ. सुधीर तांबे यांनी व्या आणि शेवटच्या फेरीत पहिल्या पसंतीची तब्बल ४२ हजार ८२५ मते प्रतिस्पर्धीपेक्षा अधिक मिळवत विजयाची हॅटट्रिक साधली. 5 व्या फेरीत डॉ. तांबे यांना पहिल्या पसंतीची ८३ हजार ३११ तर प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे डॉ. प्रशांत पाटील यांना पहिल्या पसंतीची ४० हजार ४८६ मते मिळाली. डाव्या आघाडीचे प्रा. राजू देसले यांना पहिल्या पसंतीची १८२१ मते मिळाली. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ डवले यांनी हा अधिकृत निकाल जाहीर केला. निवडणूक निरीक्षक आर. जे. कुलकर्णी हे उपस्थित होते. एकूण लाख ४३ हजार ८७६ मते मोजली गेली. ६६० मतदारांनी नोटा बजावला तर १४ हजार ८१० मते बाद झाली. डॉ. तांबे यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असतानाही डॉ. पाटील हे पराभवासमीप होते. अंबड येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे सोमवारी सकाळी वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. प्रथम सर्व मतांची मोजणी झाल्यानंतर दुपारी वाजता सुरू झालेल्या फेरनिहाय मोजणीत पहिल्या फेरीपासूनच डॉ. तांबे यांनी आघाडी घेतली. 
 
पहिल्या फेरीत ३० हजार मतांची मोजणी झाली. त्यात डॉ. तांबे यांनी पहिल्या पसंतीची हजार मते ज्यादा मिळवत आघाडी घेतली. त्यांना १७ हजार ७१७ मते मिळाली. डॉ. पाटील यांना पहिल्या पसंतीची ८०५० तर डाव्या आघाडीचे प्रा. राजू (प्रकाश) देसले यांना ३८७ मते मिळाली. ३०७३ मते बाद झाली. डॉ. तांबे यांना पहिल्या फेरीतच मोठी आघाडी मिळाल्याची माहिती समर्थकांना मिळताच मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष आणि आतषबाजी करण्यात आली. दुसऱ्या फेरीतही डॉ. तांबे यांनी आघाडी कायम राखली. त्यात डॉ. तांबे यांना पहिल्या पसंतीची ३४ हजार ८९९ मते मिळाली. डॉ. पाटील यांना १६ हजार ६५१ तर प्रा. देसले यांना ७७१ मते मिळाली. तिसऱ्या फेरीतही डॉ. तांबे यांची आघाडी अाणखी वाढली. त्यात डॉ. तांबे यांना पहिल्या पसंतीची ५२ हजार ०३४ मते मिळाली. डॉ. पाटील यांना २५ हजार ४२१ मते मिळाली. या फेरीत हजार १७१ मते बाद झाली. थ्या फेरीत डॉ. तांबे यांना पहिल्या पसंतीची ६९ हजार ५६२ मते मिळाली. डॉ. पाटील यांना ३३ हजार ६९० मते मिळाली. या फेरीत १२ हजार ४१५ मते बाद झाली. 
 
मतमाेजणी केंद्रावर नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. , अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे, नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, धुळेचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल तसेच मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नाशिक पदवीधर मतदारसंघावर ना. स. फरांदे, प्रतापदादा सोनवणे यांच्या माध्यमातून भाजपचे वर्चस्व होते. परंतु, मागील दोन निवडणुकांपासून त्यावर काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. तांबे यांनी दबदबा निर्माण केला. यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने हा गड भाजप पुन्हा काबीज करते की काय याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, डॉ. तांबे यांचा दांडगा जनसंपर्क, दोनदा आमदारकी, कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि आघाडीच्या साथीमुळे त्यांना दणदणीत विजय मिळविता अाला. 

शिक्षणसम्राटांचा प्रभाव 
मतदारसंघात शिक्षणसंस्थांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली होती. त्यावर शिक्षणसम्राटांचा प्रभाव दिसून येतो. पदवीधरांच्या प्रश्नांवर मी प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, त्यांची उत्तरे दोन्ही उमेदवारांनी दिली नाही. -प्रा. राजू देसले 

पक्षभेद करत नसल्याने सर्वांची मदत 
शिवसेना-भाजपयुतीतुटल्याचा फायदा झाला. पक्षभेद करून काम करत नसल्याने सर्वांची मदत झाली. भाजपच्याही अनेक कार्यकर्त्यांची मदत झाली. सर्वांचे आभार मानतो. पदवीधर मतदारसंघातील संधीचा चांगला उपयोग केला. सध्या शिक्षणाची अवस्था बिकट आहे. गरिबांच्या शिक्षणाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न राहतील. शिक्षकांच्या भरतीचा प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न राहील. बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापणार आहे. प्रत्येक तालुक्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यास केंद्र उभारणार आहे. -डॉ. सुधीर तांबे 
 
सूक्ष्म नियोजन, प्रभावी प्रचार यंत्रणेचा फायदा 
नाशिकपदवीधर मतदारसंघात डाॅ. सुधीर तांबे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. २००९ मध्ये तत्कालीन अामदार प्रतापदादा साेनवणे धुळे लाेकसभा मतदारसंघात विजयी झाले होते. त्यांच्या खासदारकीमुळे रिक्त झालेल्या जागेवर अवघ्या ११ महिन्यांच्या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत डाॅ. तांबे यांनी काँग्रेस बंडखाेर म्हणून निवडणूक लढविली हाेती. त्यावेळी काँग्रेस अाघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. नितीन ठाकरे भाजपचे उमेदवार डाॅ. प्रसाद हिरे यांचा हजार मतांनी त्यांनी पराभव केला हाेता. २०१० मधील निवडणुकीत डाॅ. तांबे हे काँग्रेस अाघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असता त्यांच्यासमाेर भाजपकडून प्रा. सुहास फरांदे यांनी अाव्हान निर्माण केले हाेते. 
 
या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ३५ हजारांच्या विक्रमी मतांनी ते निवडून अाले हाेते. २०१७ च्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली असून, भाजपचे उमेदवार डाॅ. प्रशांत पाटील यांचा दणदणीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत डाॅ. तांबे यांनी राबविलेली प्रचार यंत्रणा, सूक्ष्म नियाेजन अाणि माजी मंत्री बाळासाहेब थाेरात यांची कार्यतत्परताही कामी अाली. केंद्रासह राज्यातही भाजपची सत्ता असली तरी डाॅ. पाटील यांना पक्षाच्या नेत्यांकडूनच वाऱ्यावर साेडण्यात आल्याचे दिसून अाले. केवळ त्यांचे सासरे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनीच त्यांचा किल्ला लढविला, तर पालकमंत्र्यांसह लाेकप्रतिनिधींचीही उदासीनता दिसून अाली. 
 
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ: राष्ट्रवादीकाॅँग्रेसचे विद्यमान अामदार विक्रम काळे यांची सलग तिसऱ्यांदा विजयाच्या दिशेने घोडदौड सुरु होती. 

अमरावती पदवीधर मतदारसंघ : भाजपचेउमेदवार गृहराज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनीही माेठ्या मताधिक्याने विजय मिळवला. 

काेकण शिक्षक मतदारसंघ : राष्ट्रवादीकाॅँग्रेस शेकाप अाघाडीचे उमेदवार बळीराम पाटील हेही निर्णायक अाघाडीवर हाेते. 
 
बातम्या आणखी आहेत...