आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचारबंदी असूनही दगडफेक, 40 जखमी, पालकमंत्र्यांसमाेर ट्रक पेटविण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरसूलमध्ये मंगळवारी उसळलेल्या दंगलीची तीव्रता बुधवारीही कायमच हाेती. सलग दुसऱ्या दिवशीही हल्लेखाेरांनी ट्रकची जाळपाेळ, दगडफेक केली. तशाही स्थितीत गावातील परिस्थिती जाणून घेताना पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह पाेलिस अधिकारी. - Divya Marathi
हरसूलमध्ये मंगळवारी उसळलेल्या दंगलीची तीव्रता बुधवारीही कायमच हाेती. सलग दुसऱ्या दिवशीही हल्लेखाेरांनी ट्रकची जाळपाेळ, दगडफेक केली. तशाही स्थितीत गावातील परिस्थिती जाणून घेताना पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह पाेलिस अधिकारी.
नाशिक - हरसूल येथे मंगळवारी झालेल्या दंगल प्रकरणात पाेलिसांनी निरपराध नागरिकांना ताब्यात घेतल्याने हरसूल परिसरातील नागरिकांनी संचारबंदी असूनही बुधवारी पुन्हा जाेरदार दगडफेक दुकानांची जाळपाेळ केली. सुमारे अर्धातास सुरू असलेल्या या धुमश्चक्रीत ४० पाेलिस जखमी झाले. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही जमावावर िनयंत्रण मिळविण्यासाठी पाेलिसांना हवेत गाेळीबार करावा लागला. येथे शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी भेट देणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमाेरच काही तरुणांनी ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तैनात बंदाेबस्तामुळे गावाला जणू छावणीचे स्वरूप अाले अाहे. तर, तणाव कमी हाेण्याची शक्यता नसल्याचे जाणवताच अनेक ग्रामस्थांनी घरे साेडल्याने गाव अाेस पडले अाहे.

भगीरथ चाैधरी या तरुणाच्या मृत्यूची चाैकशी करावी, या मागणीसाठी निघालेल्या माेर्चानंतर मंगळवारी हरसूलमध्ये दंगल उसळली हाेती. या प्रकरणी पाेलिसांनी काही नागरिकांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. ते निरपराध असून, त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी एका गटाने बुधवारीही परत दगडफेक करीत दुकानांची जाळपाेळ केली. त्यांनी एका हाॅटेलमधील गॅस िसलिंडर पाठाेपाठ ट्रकही जाळण्याचा प्रयत्न केला. त्यास िवराेध करण्यासाठी हरसूलमधील काही ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. त्यांनी पाेलिसाोसोबत उभे राहत लूट जाळपाेळ करणाऱ्या गटाला िवराेध करून अनेक दुकाने वाचविली. दगडफेकीत जखमी पाेलिसांना नागरिकांना उपचारांकरिता पाठविण्यासाठी नाशिकहून रुग्णवाहिका मागविण्यात आल्या. पोलिसांसह जखमींवर उपचार सुरू आहेत.

पाेलिस संरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष: तरुणाच्यासंशयास्पद मृत्यूनंतर हरसूलचे सरपंच जनार्दन पारधी यांनी जमावाचा उद्रेक हाेण्याची शक्यता व्यक्त करीत गावाला पाेलिस संरक्षण देण्याची मागणी केली हाेती. त्यांनी तसे लेखी िनवेदन िदले हाेते. मात्र, त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याचे ध्वजाराेहण असल्याने हरसूलला बंदाेबस्त देणे शक्य झाले नाही. त्याची परिणती या उद्रेकात झाली.

शांतता समितीची बैठक : दंगलीनंतरगावात शांतता समितीची बैठक घेण्यात अाली. या वेळी लुटमार करणाऱ्या गटाशी चर्चा करण्यात येऊन शांतता राखण्याचे अावाहन करण्यात अाले. गुप्तवार्ता विभागाने त्याची पूर्वकल्पना दिली होती, तरीदेखील हरसूल पोलिसांनी कारवाई केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे मत यावेळी व्यक्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

गाव पडले ओस...
दंगलीमध्येहोरपळलेल्या अनेक ग्रामस्थांनी गाव सोडले अाहे. मिळेल त्या वाहनाने ते शहराकडे रवाना हाेत अाहेत. नातेवाईक परिचितांकडे त्यांनी आश्रय घेतला अाहे. गावातील इतर समाजाच्या नागरिकांनादेखील लक्ष्य करण्यात आल्याने तणाव अाणखी वाढला अाहे.

व्यापाऱ्यांमध्येही दहशत
हरसूलमध्येझालेल्या दंगलीत अनेक दुकानांची जाळपाेळ लुटमार करण्यात अाली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून, दुकानातील माल माैल्यवान साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू हाेते.

अातापर्यंत ६७ पाेलिस कर्मचारी जखमी
हरसूलपरिसरात झालेल्या दंगलीमध्ये दाेन दिवसांत सुमारे ६७ पाेलिस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत अाहे. मंगळवारी सुमारे २७, तर बुधवारीही सुमारे ४० पाेलिस जखमी झाले अाहेत.

पाेलिस उपअधीक्षकांचे पिस्तूल गायब
पाेलिस उपअधीक्षक प्रवीण मुंडे हे दंगलीत जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू अाहेत. या दंगलीदरम्यान त्यांचे पिस्तूल हरविल्याचेही सांगण्यात अाले. त्याला अधिकृत सूत्रांनी दुजाेरा मात्र दिला नाही.

अफवांवर विश्वास ठेवू नका...
दंगली भडकवण्याच्या उद्देशाने अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. परिस्थिती नियंत्रणात आहे. - संजय मोहिते, पाेलिस अधीक्षक
पुढील स्लाइडमध्ये, पालकमंत्र्यांनी घेतली जखमी पोलिसांची भेट
बातम्या आणखी आहेत...