आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांनी लघुपटातून अनुभवला खेळांचा थरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- हजारोफूट डोंगरावर चढाई करता करता डॅनी सायकल खांद्यावर नेतो, डोंगराच्या सुळक्यांवरून सायकलवर स्वार होऊन सायकल चालवत पुन्हा खाली येतो. ऐकून नवल वाटते, पण हे सत्य आहे.
२०१४ मध्ये स्कॉटलँडमधील आइस ऑफ स्काय या डोंगरावर डॅनी मॅक्सवेल याने हा साहसी खेळ केला होता. यासारखेच १३ साहसी खेळ चित्रबद्ध केले असून, त्याचे लघुपट तयार केले आहेत. हे लघुपट पाहण्याची संधी नाशिककरांना रविवारी थोरात सभागृहात मिळाली. निमित्त होते बांफ माउंटेन फिल्म फेस्टिव्हल वर्ल्ड टूरचे. वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेने याचे आयोजन केले होते. अध्यक्ष अविनाश माळोदे, अविनाश जोशी सचिन घोलप यांनी त्याचे उद्घाटन केले.

कॅनडामधील बांफ या छोट्याशा गावात गेल्या तीन वर्षांपासून चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो. जगभरातून दरवर्षी ३०० साहसी खेळांचे लघुपट बांफ मागवते. त्यातून यंदा ६० लघुपटांची निवड झाली असून, त्यातील १३ लघुपट हे वर्ल्ड टूर महोत्सवासाठी निवडले आहेत. भारतात केवळ मुंबईमध्ये आयोजित होणाऱ्या या महोत्सवाला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर कॅनडाच्या परराष्ट्र विभागाने लेह-लडाख, नाशिक, बडोदा हैदराबाद येथे महोत्सवाला परवानगी दिली आहे.
अमेरिकेतील झुऑन पार्कमध्ये बर्फाचे उंच जीवघेणे धबधबे आहेत. मात्र, जीसेस ह्यून आणि स्कॉट अॅडमसन हे दोघे कसे ट्रॅकिंग करतात, हे डेझर्ट आइस लघुपटात दाखवले आहे.
स्कॅननायडर हा खेळात फेथ् डियीकिई या तरुणीने आगळावेगळा विक्रम केला आहे. वाइड वुमन या लघुपटात फेथ उंच दोन डोंगरांना बांधलेल्या दोरीवरून चालते. रबी मुरू हिचा प्रेमभंग झाल्याने ती सतत धावते त्यातून आलेले नैराश्य दूर करते. त्यामुळे नैराश्य आले तर आत्महत्या करता धावत राहा, त्यातून नैराश्य दूर हाेते, असा संदेश रबी मुरी हिने ‘जस्ट किप रनिंग’मधून दिला आहे.
निसर्ग प्रेमींसाठी नजराणा
महोत्सव निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमींसाठी फायदेशीर ठरणार आहे. वैनतेय गिर्यारोहण संस्थेच्या या आयोजनातून साहसी खेळ पाहायला मिळाले.
डॉ. मनीषा रौंदळ, सायकलपटू
वारंवार आयोजन करावे
साहसीखेळ पाहिल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होेते. आत्मविश्वास आणि धाडस वाढते. अशा महाेत्सवाचे वारंवार आयोजन झाले पाहिजे.
-आशिष शिंपी

यातून आत्मविश्वास वाढतो
जिद्द असल्यास यशाचे शिखर गाठू शकतो. असे लघुपट पाहिल्यानंतर आत्मविश्वास नक्कीच वाढीस लागतो.
- सई घाटे
बातम्या आणखी आहेत...