आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nashik High Profile Leaders Area Posh Other Side Road Problems

PHOTOS: महापालिकेचा दुजाभाव, नेत्यांचे रस्ते ‘पॉश’... बाकी सत्यानाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहराचा प्रथम नागरिक म्हणून ज्यांनी एकेकाळी शेखी मिरवली आणि सध्या जे या पदावर विराजमान आहेत, अशा आजी-माजी महापौरांच्या आत्मविकासाचा मार्ग भरपावसाळ्यातही आश्चर्यकारकरीत्या चकचकीत दिसत आहे. दुसरीकडे, ज्यांच्या जिवावर या मंडळींवर महापौरपदाची झूल चढली, त्या जनतेचा मार्ग मात्र, खडतर असल्याने महापालिकेच्या सेवा कोणासाठी आणि जनतेकडून मिळणार्‍या करांचा विनियोग कोणासाठी, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्यांच्या बाबतीतील दुजाभावाची ही आँखो देखी...

शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे आणि या खड्डय़ांमधून करावी लागणारी कसरत नाशिककरांना नवी नाही. पावसाळ्याच्या काळात, तर या खड्डय़ांची अवस्था ‘मौत का कुआ’सारखी होते. या काळात मणके विकारतज्ज्ञांकडे सर्वाधिक गर्दी असते ती या खड्डय़ांमुळेच.

अशा या खड्डय़ांमध्ये दर पावसाळ्यात लाखोंचा निधी टाकला जातो तरीही परिस्थितीत फारसा बदल जाणवत नाही. त्यामुळे एखाद्या पक्षाला खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण करावे लागते, तर कोणाला ‘लांब उडी स्पर्धा’ घेऊन सत्ताधार्‍यांची कानउघाडणी करावी लागते. तरीही सर्वसामान्यांना जो त्रास सहन करावा लागतो तो लागतोच. दुसरीकडे मात्र राजकीय पुढार्‍यांची आवक-जावक असलेले रस्ते टकाटक दिसतात.

पुढील स्लाइडला क्लिक करुन पाहा, नाशिकमधील मातब्बर नेत्यांच्या घरी जाणे किती सोयीचे आहे.