आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेठ, दिंडोरी रोडवर वाहतुकीसाठी राजमार्ग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थानिमित्ताने महापालिकेकडून पेठ आणि दिंडोरी रोड सात मीटरवरून तब्बल तेरा मीटरचा करण्यात आला आहे. एकाचवेळी आता शेजारून चार वाहने ये-जा करू शकतात, तर आरोग्य विद्यापीठाच्या बाहेरील भागात 25 मीटरपर्यंतचा भाग विकसित होत असून, त्यासाठी गॅबियन वॉलही बांधण्यात येत आहे. सिंहस्थकाळातील वाहतुकीचा खोळंबा रोखण्यासाठी रिंगरोड विकसित करण्यासह उर्वरित रस्त्यांच्या रुंदीकरणास आता सुरुवात झाली आहे.

जानेवारीपर्यंत रस्त्यांची कामे पूर्णत्वास : रुंदीकरणात अडथळा येत असलेल्या वृक्षांच्या तोडीस परवानगी मिळाल्यास जानेवारीपर्यंत संपूर्ण कामे पूर्णत्वास येतील.
अत्याधुनिक तंत्रज्ञान; वॉटरप्रूफ रस्ते : परिवहन मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता तयार करण्याच्या निकषानुसार हे काम होत आहे. आता मुरूमाऐवजी स्टोन पावडरचा वापर होतो. याशिवाय, वेट मिक्स मॅकॅडम, गॅन्युलर सब बेस, मोटर ग्रेडर, 7 व 9 मीटर रुंदीचे पेव्हर, व्हायबट्ररी व न्यूमॅटिक रोलर, मेकॅनिकल स्प्रेअर यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर होत आहे.

वाहतूक कोंडीवर तोडगा
सिंहस्थ कामांतर्गत शहरात अंतर्गत रिंगरोड व बाह्य रिंगरोड ही महत्त्वपूर्ण कामेही सुरू आहेत. डांबरीकरण, रुंदीकरण, काँक्रिटीकरण, मजबुतीकरण यासारख्या कामांवर भर दिला जात आहे. दिंडोरी व पेठ रोडच्या रुंदीकरणामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटणार आहे. सुनील खुने, शहर अभियंता
पेठरोडवर सध्या 57 झाडे रस्ता रुंदीकरणात येत आहेत. या वृक्ष तोडीबाबत प्राधिकरण समितीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, रस्त्याच्या दुसर्‍या थराच्या कामाला प्रारंभ होऊनही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या कामास विलंब होणार आहे. समितीने कार्यवाही केल्यानंतर हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत.

गुजरातकडे जाण्यासाठी रस्ता ‘मोकळा’
सिंहस्थ कुंभमेळ्या निमित्ताने निमाणी चौक ते गोरक्षनगर चौक, गोरक्षनगर चौक ते वाघेरे रस्ता आणि वाघेरे रस्ता ते महापालिका हद्द असे तीन टप्प्यांत दिंडोरीरोडचे रुंदीकरण होत आहे. यातील वाघेरे रस्ता ते महापालिका हद्द या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. दिंडोरी, कळवण, वणी, सापुतारा आणि गुजरातकडे जाण्यासाठी दिंडोरीरोडचा वापर केला जातो. रुंदीकरणामुळे आता वाहतूक सुरळीत होणार आहे. शिवाया वाहतूकदारांचा वेळही मोठय़ा प्रमाणात वाचणार आहे.