आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पोटच्या पोरीच्या जिवावर उठणार्‍याला फाशीच द्या’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘आमच्यामागे काही गणगोत नाही. आम्ही तिघी बहिणी. आमच्या पाठीवर मुलगा नाही. आता पोरीचा जीव घेतला अन् माझी दुनियाच संपवली. त्याला फाशी द्या. मला असला नवरा नको. त्याला फाशी हो फाशीच द्या, तेवढीच इच्छाय आता, आता काय बी नाय उरलं माझ्यापाशी.’ प्रमिलाची आई संतापून ‘दिव्य मराठी’शी बोलत होती आणि बोलता बोलता आसवांच्या धारा तिच्या चेहर्‍यावरून वाहत होत्या. आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून प्रमिला कांबळे या आपल्या पोटच्या पोरीचा तिच्या गर्भात वाढणार्‍या बाळासह निर्घृण खून करणार्‍या एकनाथ कुंभारकरची पत्नी अरुणा यांचा हा आक्रोश जीव हेलावून टाकत होता.
या वेळी अरुणा म्हणाल्या, ‘झालं ते झालं, पण तो आता सुटला तर प्रमिलाचा भाऊ म्हणजे माझ्या पोराला व मलाबी तो सोडणार नाही. निदान आमच्यासाठी तरी त्याला असं मोकाट सोडू नका, माझा नवरा रोज दारू प्यायचा. पोरीला त्याने त्रास देऊ नये म्हणून मी त्याला माझ्या जिवावर पोसायचे. तो प्रमिलाला आठ-आठ दिवसांनी माहेरी आणायचा. ती पैसे द्यायची तोवर गोड राहायचा.’ मात्र, त्याने तिला एकदाचे मारूनच टाकले, अशी आपबिती प्रेमिलाच्या आईने व्यक्त केली.